ETV Bharat / state

चंद्रपूर : 24 ग्रॅम ब्राऊन शुगर पकडून युवकाला अटक - brown sugar news chandrapur

चंद्रपुरात दारुबंदी झाल्यापासून अमली पदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. महाविद्यालयीन युवक-युवती नशेच्या जाळ्यात ओढले गेल्याचे चित्र आहे. त्यामुळे अशा अमली पदार्थांची तस्करी वाढली आहे.

brown sugar
ब्राऊन शुगर
author img

By

Published : Mar 8, 2021, 3:14 PM IST

Updated : Mar 8, 2021, 4:03 PM IST

चंद्रपूर : शहरात सध्या ब्राऊन शुगरसारख्या अमली पदार्थांची मागणी वाढली आहे. याच परिस्थितीत आज एका तरुणाकडून 24 ग्रॅम ब्राऊन शुगर जप्त करण्यात आली. वरोरा नाका परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून ही कारवाई केली. याप्रकरणी 24 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. अजय सीताराम गुणीरविदास असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत एलसीबीचे अधिकारी माहिती देताना.

दीड लाखांचे अमली पदार्थ जप्त -

चंद्रपुरात दारुबंदी झाल्यापासून अमली पदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. महाविद्यालयीन युवक-युवती नशेच्या जाळ्यात ओढले गेल्याचे चित्र आहे. त्यामुळे अशा अमली पदार्थांची तस्करी वाढली आहे. यासाठीचे एक वेगळे रॅकेट सक्रिय आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात यावर कारवाई करण्याचा सपाटा सुरू झाला आहे. यापूर्वी 55 ग्रॅम ब्राऊन शुगर जप्त करण्यात आली होती. यानंतर आज (सोमवारी) दुपारी दीडच्या सुमारास एक युवक खासगी ट्रॅव्हल्समधून नागपूरहुन चंद्रपूरला ब्राऊन शुगर घेऊन येत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार वरोरा नाका येथे सापळा रचण्यात आला. हा युवक वरोरा नाक्यावर उतरताच त्याला ताब्यात घेण्यात आले. यावेळी तपासणी केली असता त्याच्याकडून दोन पॅकेटमधून तब्बल 24 ग्रॅम ब्राऊन शुगर जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाची किंमत जवळपास एक ते दीड लाख रुपये आहे.

हेही वाचा - राज्याच्या अर्थसंकल्पातून काय आहेत सामान्य जनेतच्या अपेक्षा, वाचा...

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे यांच्या नेतृत्वातील पथकाने केली. अजय सीताराम गुणीरविदास असे या आरोपीचे नाव आहे. तो लालपेठ कोलॅरी येथील रहिवासी आहे. त्याने अभियांत्रिकेचे शिक्षण घेतले आहे.

हेही वाचा - 'मनसुख हिरेन यांच्या पत्नीच्या संशयानंतरच हत्येचा गुन्हा दाखल'

Last Updated : Mar 8, 2021, 4:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.