ETV Bharat / state

चंद्रपूर : दिराची वहिनीला मारहाण; पोलिसांची तक्रार घेण्यास टाळाटाळ - chandrapur latest news

शहरातील पठाणपुरा वॉर्डात येणाऱ्या ठक्कर कॉलनी येथे दिराने वहिनीला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या मारहाणीत महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या डोक्याला चार टाके पडले आहे. तर पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप महिलेने केला आहे.

brother in law beaten his sister-in-law in chandrapur
चंद्रपूर : दिराची वहिनीला मारहाण; पोलिसांची तक्रार घेण्यास टाळाटाळ
author img

By

Published : Jan 30, 2021, 7:11 PM IST

चंद्रपूर - घरातील भिंत बांधण्यावरून दिराने वहिनीला मारहाण केल्याची घटना शहरातील पठाणपुरा वॉर्डात येणाऱ्या ठक्कर कॉलनी येथे उघडकीस आली आहे. या मारहाणीत महिलेच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून या घटनेची तक्रार देण्याकरिता ती पोलीस ठाण्यात गेली असता, पोलिसांनी या घटनेची तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. तसेच तिच्या दिरावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही तिने पत्रकार परिषदेत केली आहे. दिपाली करण टेमरे असे या महिलेचे नाव आहे.

महिलेची प्रतिक्रिया

भिंत बांधण्यावरून या दोघांमध्ये वाद -

दिपाली या शहरातील पठाणपुरा वॉर्डात येणाऱ्या ठक्कर कॉलनी येथे राहते. तर त्यांचा दीर रजनीकांत टेमरे हा दुसऱ्या मजल्यावर राहतो. 26 जानेवारीला सायंकाळी घरातील भिंत बांधण्यावरून या दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने रजनीकांतने दिपाली यांना अश्लील भाषेत शिविगाळ करण्यात सुरूवात केली. तसेच दिपाली यांना मारहाणही केली. या मारहाणीत दिपाली यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या डोक्याला चार टाके पडले आहे. त्यानंतर रजनीकांतने दिपाली यांच्या गाडीचे तसेच मोबाईलचीही तोडफोड केली. याघटनेची तक्रार करण्याकरिता दिपाली या पोलीस ठाण्यात गेल्या असता हा घरघुती वाद आहे, असे सांगत पोलिसांना तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. असा आरोप त्यांनी पत्रकार परिषद घेऊन केला.

हेही वाचा - कर्मचाऱ्यांच्या मनातील भीती घालवण्यासाठी अधिकाऱ्यांंनी घेतली कोरोनाची लस

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.