चंद्रपूर - जिल्ह्यातील धाबा येथे देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ग्रंथदिंडी काढण्यात आली. हातात पुस्तके घेवून 'वाचाल तर वाचाल, शिकाल तर शिकाल,' असा संदेश शाळकरी विद्यार्थ्यांनी दिला.
हेही वाचा - नागपुरात दोन ठिकाणाहून १ कोटीची रक्कम जप्त
धाबा येथील जनता विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ग्रंथदिंडी काढली. या दिंडीत सहभागी विध्यार्थ्यांचा हातात पुस्तके होती. आकर्षक वेशभूषा केलेल्या विद्यार्थिनी आणि लेझिम नृत्य करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मुख्यधापक एस. एन. पेंढारकर, संजय ठाकरे, बबन पत्तीवार, एस.ए.बोरडे, डी.वाकडे विद्यार्थ्यांसोबत उपस्थित होते.