ETV Bharat / state

रितेश-जेनेलियाची सहकुटुंब ताडोबा सफारी.. वाघोबाच्या दर्शनासाठी अभयारण्यात दोन दिवस मुक्काम - रितेश-जेनेलिया

जगप्रसिध्द ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात (Tadoba-Andhari Tiger Project )रितेश देशमुख त्याची पत्नी जेनेलिया (Riteish deshmukh and Genelia Dsouza) आणि आपल्या दोन मुलांना घेऊन ताडोबा सफारी केली. दोन दिवसापूर्वी त्याने सकाळी आणि दुपारी देखील सफारी केली. रितेश देशमुखने दोन दिवस ताडोबात मुक्काम केला.

tadoba national park
tadoba national park
author img

By

Published : Dec 31, 2021, 4:42 PM IST

चंद्रपूर - जगप्रसिध्द ताडोबा-अंधारी (Tadoba-Andhari Tiger Project ) व्याघ्रप्रकल्पात रितेश देशमुख त्याची (Riteish deshmukh and Genelia Dsouza) पत्नी जेनेलिया आणि आपल्या दोन मुलांना घेऊन ताडोबा सफारी केली. दोन दिवसापूर्वी त्याने सकाळी आणि दुपारी देखील सफारी केली. रितेश देशमुखने दोन दिवस ताडोबात मुक्काम केला.

ताडोबाची ख्याती आता जगभरात पसरली आहे. ताडोबा म्हणजे हमखास व्याघ्रदर्शन हे समीकरण आता घट्ट झाले आहे. त्यामुळेच याची भुरळ अनेक सेलिब्रिटींना पडली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे, अनिल कुंबळे, कुणाल खेमु, सोहा अली खान अशा अनेक जगप्रसिद्ध सेलिब्रिटींनी ताडोबात आवर्जून हजेरी लावली आहे. सचिन तेंडुलकर तर दरवर्षी सहकुटुंब ताडोबात आवर्जून हजेरी लावतो.

रितेश-जेनेलियाची सहकुटुंब ताडोबा सफारी..

हे ही वाचा - Tiger Caught In Chandrapur : अखेर ती वाघीण जेरबंद, ३ जणांचा घेतला होता बळी

मंगळवारी ताडोबात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव आणि बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख त्याची अभिनेत्री पत्नी जेनेलिया (Riteish deshmukh and Genelia Dsouza) यांनी आपल्या दोन मुलांसह ताडोबात एन्ट्री केली. नागपूरमार्गे ते मुधोली येथील लिंबन नामक रिसॉर्टमध्ये दाखल झाले. आज सकाळी रितेशने आपल्या कुटुंबासह ताडोबातील कोअर झोनमध्ये सफारी केली, मात्र वाघाचे दर्शन झाले नाही. जिप्सीवरून सफरीला जातानाचा त्याचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दोन दिवस रितेशचा ताडोबात (Tadoba-Andhari Tiger Project ) मुक्काम होता. रितेश आणि जेनेलियाची एक झलक बघण्यासाठी त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता लागलेली होती.

हे ही वाचा - VIDEO : चंद्रपूर जिल्ह्यातील भटाळी येथे वाघाची दहशत; वाघ आणि गावकरी आले समोरासमोर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.