चंद्रपूर - पवार आणि काँग्रेसनी ३७० बाबत समर्थन दिले नाही. त्याचा विरोध केला. सत्ता आल्यास ३७० परत आणणार का, हे पवारांनी सांगावे. तसेच पवार यांना मतलालसा मोतीबिंदू झाला असल्याची टीका भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी केली. राजूरा विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार संजय धोटे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
सामान्य माणसाने आम्हाला लोकसभेत ३०० जागा दिल्या. आम्ही ३७० कलम हटविले. मात्र, महाराष्ट्र आणि ३७० चा काय संबंध, असे प्रश्न विरोधकर विचारत आहेत. मात्र, ते विसरले असतील की महाराष्ट्राची भूमी छत्रपती शिवाजी महाराज, टिळकांची भूमी आहे. ही काश्मीरला साथ देईल, असे शाह म्हणाले.