चंद्रपूर : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (BJP President JP Nadda) हे आज चंद्रपुरात दाखल होणार आहेत. ते आज एका जाहीर सभेला ते संबोधित करणार (J P Nadda public meeting in Chandrapur) आहेत. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांची देखील प्रमुख उपस्थिती असणार (Deputy CM Devendra Fadnavis and Sudhir Mungantiwar) आहे.
जाहीर सभा : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मोठे यश मिळावे म्हणून जगत प्रकाश नड्डा देशातील लोकसभा क्षेत्राचा दौरा करणार (public meeting in Chandrapur) आहेत. याची सुरुवात चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रातून आज सोमवारी 2 जानेवारी 2023 ला दुपारी 12 वाजता, न्यु इंग्लिश हायस्कूल ग्राऊंड, विश्रामगृह समोर येथील 'विजय संकल्प' जाहीर सभेच्या माध्यमातून केली जात ( BJP Preparations for Lok Sabha elections) आहे.
प्रवास दौरा : 2019 च्या निवडणुकीत भाजपाने 545 पैकी 282 जागा जिंकत परत एकदा वर्चस्व स्थापित केले. ही संख्या अजून वाढावी म्हणून व जेथे भाजपाचे खासदार नाही, अश्या लोकसभा मतदारसंघाचा जे. पी. नड्डा पहिल्या टप्प्यात प्रवास दौरा करणार आहेत. पहिल्या टप्प्यात 144 मतदारसंघ असून यात महाराष्ट्रातील 16 मतदारसंघाचा समावेश आहे. या प्रवास दौऱ्याची सुरवात चंद्रपुरातील विजय संकल्प जाहिरसभेने होणार (J P Nadda public meeting) आहे.
भाजपचा निर्धार : भारतीय जनता पार्टी (भाजप) अध्यक्ष जेपी नड्डा सोमवारी पक्षाच्या एक भाग म्हणून चंद्रपूर (BJP Sabha Chandrapur) येथून मोहिमेची सुरुवात करतील. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत (BJP Lok Sabha Election Preparations) महाराष्ट्रातून 18 'कठीण' जागा जिंकण्याची योजना आहे, असे एका भाजप नेत्याने रविवारी सांगितले. नड्डा पूर्व महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि मराठवाड्यातील औरंगाबाद (BJP Sabha Aurangabad) येथे सभांना संबोधित करणार आहेत. या दोन्ही ठिकाणांवर कमळ फुलविण्याचा भाजपचा निर्धार जाणवतो.
यावेळी जाहिरसभेचे अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक म्हणून भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांची तर प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तसेच माजी केंद्रीयमंत्री हंसराज अहिर, खासदार अशोक नेते, खासदार रामदास तडस, आमदार संजीव रेड्डी, आमदार संदीप धुर्वे, आमदार डॉ. रामदास आंबटकर व आमदार बंटी भंगाडीया यांची उपस्थिती राहणार आहे.