राजूरा (चंद्रपूर) - काही दिवसापूर्वी आलेल्या वादळी पावसात शेतपिके जमिनीवर लोळली होती. हातात येणाऱ्या पिकांचे नुकसान बघून बळीराजा खचला होता. यातून अद्यापही बळीराजा सावरलेला नाही.अशात आता वन्यजीवांनी घातलेल्या धुमाकुळाने शेतपिकांचे मोठे नुकसान होत आहे. या दूहेरी संकटाने गोंडपिपरी तालुक्यातील बळीराजा हवालदिल झाला आहे.
शेताततील उभ्या पिकात वन्यजीवांचा हैदोस सूरू आहे. या प्रकाराने शेतपिकांचे मोठे नुकसान होत आहे. वन्यजीवांना शेतपिकांपासून दूर ठेवण्यासाठी बळीराजा नानाविध उपाययोजना अमलात आणत आहे. मात्र या उपाययोजना कुचकामी ठरत आहे. दूसरीकडे नुकसान झालेल्या पिकांच्या तूलनेत वनविभागाकडून मिळणारी नुकसानभरपाईची रक्कम तोकडी आहे. त्यामुळे अनेक शेतकरी नुकसान भरपाईचा अर्ज वनविभागाकडे करत नसल्याचे चित्र आहे. शेतपिकावर ओढावलेल्या दूहेरी संकटाने बळीराजा हवालदिल झाला आहे.