चंद्रपूर - गाोंडपिपरी तालुक्यातील धाबा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या हिवरा येथे 'आमचा मुलगा पोलीस' या अभियानांतर्गत ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. धाब्याचे ठाणेदार सुशिल धोपटे यांच्या पुढाकारातून संपन्न झालेल्या या कार्यक्रमात हिवरावासियांनी मोठी गर्दी केली.
हेही वाचा - चिमूर शहराजवळ वाघाची दहशत, एका आठवड्यात २ गायींचा फडशा
चंद्रपूर जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी ज्येष्ठ नागरिक सन्मानासाठी जनजागृती करा, असे आदेश ठाणेदारांना दिले होते. त्यांच्या या आदेशानुसार धाबा पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुशिल धोपटे यांनी हिवरा गावात हा उपक्रम राबविला. या जनजागृती कार्यक्रमांतर्गत त्यांनी गावकऱ्यांना ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्याचे आवाहन केले. ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षितेतसाठी शासनाने 2007 मध्ये कायदा केला आहे. आता या कायद्यात अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. या कायद्यानुसार आई वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांना दंड आणि शिक्षेची तरतुद करण्यात आली आहे.
हेही वाचा - चंद्रपुरात पतीवर गुन्हा दाखल केल्याने पत्नीने पोलीस ठाण्यातच घेतले विष
अनेक कुटुंबात आई वडिलांची कुचंबना होते. आपणही कधी आई वडील होणार. आपल्या मुलांनी आपली अशीच अवस्था केली, तर या भीतीतून तरी आईवडिलांचा सन्मानपूर्वक सांभाळ करावा, असे आवाहन त्यांनी केले.
ठाणेदार सुशिल धोपटे यांनी नुकताच धाबा ठाण्याचा पदभार स्विकारला. जनता आणि पोलीस प्रशासनाच्या समन्वयातून आपण आपले कर्तव्य पार पाडणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी हिवरा गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली.