ETV Bharat / state

Water Supply Cut Off:सत्ताधारी नगरसेविकेकडून महापालीकेच्या विरोधात आंदोलन - Chandrapur Municipal Corporation

सहा दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प (Water supply cut off ) आहे. ऐन उन्हाळ्यात जनतेचा संताप होत असून आता भाजपशासित चंद्रपूर महानगरपालीकेच्या (Chandrapur Municipal Corporation) ढिसाळ नियोजनाविरोधात खुद्द भाजपचेच नगरसेवक उतरले (An agitation was organized by the ruling corporator) आहेत. भिवापूर प्रभागातील नगरसेविका तथा झोन 2 च्या सभापती खुशबू अंकुश चौधरी यांनी मडका फोडो आंदोलन केले. तर दुसरीकडे विठ्ठल मंदिर वॉर्डातील नगरसेविका संगीता खांडेकर यांनीही आंदोलन केले.

Corporator's agitation
नगरसेविकेचे आंदोलन
author img

By

Published : Mar 29, 2022, 8:34 AM IST

चंद्रपूर: चंद्रपूर शहरात इरई धरणातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. मात्र, महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या परिसरात गुरुवारी पाईपलाईन फुटली. तेव्हा दोन दिवसात पाईपलाईन दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल अशी माहिती मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने दिली होती. पण पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकला नाही. (Water supply cut off ) त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. महानगरपालिका Chandrapur Municipal Corporation) प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे चंद्रपूरकर नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. भिवापूर प्रभाग 14 (पठाणपुरा) नगरसेविका तथा झोनच्या सभापती खुशबू चौधरी, मनसे जिल्हा उपाध्यक्ष शोभाताई वाघमारे, उषा वाघमारे यांच्या उपस्थितीत पठाणपुरा येथील महिलांनी आंदोलन करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. पाच दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी खुशबू चौधरी यांनी केली आहे.

हेहीवाचा : चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राला संपाचा फटका; पाच युनिट बंद, साडेपाचशे मेगावॉटचे उत्पादन ठप्प

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.