ETV Bharat / state

आदिवासी युवकांना मारहाण प्रकरणी राजू झोडे आणि वनविभाग आमनेसामने

दोन आदिवासी युवकांना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी अमानुष मारहाण केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी लावून धरले असून याप्रकरणी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी झोडे यांनी केली आहे. तर वनविभागाच्या संघटनेने राजू झोडे हे वनविभागाच्या कार्यात अडथळा आणत असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

राजू झोडे आणि वनविभाग आमनेसामने
राजू झोडे आणि वनविभाग आमनेसामने
author img

By

Published : Jan 5, 2022, 8:30 AM IST

चंद्रपूर - गेल्या अनेक दिवसांपासून वादात असलेले वनविभागाचे आणखी एक प्रकरण समोर आले. दोन आदिवासी युवकांना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी अमानुष मारहाण केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी लावून धरले असून याप्रकरणी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी झोडे यांनी केली आहे. तर वनविभागाच्या संघटनेने राजू झोडे हे वनविभागाच्या कार्यात अडथळा आणत असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

आदिवासी युवकांना मारहाण प्रकरणी राजू झोडे आणि वनविभाग आमनेसामने

झोडेविरोधात वनकर्मचाऱ्यांच्या संघटनेची तक्रार

उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे शासकीय कामात अडथळा निर्माण करतात. जंगला लगतच्या गावातील लोक आणि वनविभागात दरी निर्माण करतात. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जावा, अशी मागणी फॉरेस्ट रेंजर्स असोसिएशन, चंद्रपूर वनवृत्त यांनी केली. सन २०२० मध्ये झोडे यांनी वनविभागाच्या अतिक्रमण काढण्याच्या कारवाईत अडथळा निर्माण केला होता. त्यावेळी त्यांच्यावर रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ३० डिसेंबर रोजी भारत कोवे यांच्या मृत्यू प्रकरणात दोघांवर वनगुन्हा नोंदविण्यात आला. चौकशीसाठी दोघांना बोलविण्यात आले. दरम्यान, राजू झोडे लोकांना भडकावून क्षेत्रीय वनकर्मचारी यांच्या कामात अडथळा निर्माण करून मारहाण करण्याची धमकी दिली. तसेच पुढील कार्यवाहीत अडथळा निर्माण करण्यासाठी त्यांनी डोणी आणि फुलझरी गावातील लोकांनी एकत्र केले. शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यासाठी खोटी तक्रार दाखल केलेली आहे, असा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला. राजू झोडे यांच्यावर भादंवी ३५३ अन्वये गुन्हा दाखल करा अशी मागणी यावेळी करण्यात आली. पत्रकार परिषदेला पी.एम. राठोड, आर.जी. मून, पल्लवी चव्हाण, आर. ए, कारेकार उपस्थित होते.

वनविभागाची वादग्रस्त प्रकरणे

वनविभागाकडून गावकऱ्यांना अमानुष मारहाण करण्याची अनेक प्रकरणे मागील काही महिन्यात घडली. 24 नोव्हेंबरला चिचोली गावात वन्यजीवाची शिकार झाल्याची गुप्त माहिती चंद्रपूर वनविभागाला मिळाली. याची कुठलीही शहानिशा न करता चार दलित आणि आदिवासी व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले. त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली. मारहाण करताना त्यांच्या गुप्तांगांना करंट लावण्यात आला, असा गंभीर आरोप पीडितांनी केला. याविरोधात वनकर्मचारी यांच्यावर अट्रॉसीटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर 30 डिसेंबरला ताडोबा बफर क्षेत्रात तीन युवक गेले होते. त्यांची दुचाकी बंद पडली. जवळच वाघ असल्याने त्यांनी पलायन करण्याचा प्रयत्न केला. यात वाघाच्या हल्ल्यात भारत कोवे याचा मृत्यू झाला. मात्र, हा वाघाचा हल्ला नसून दोन युवकांनी मृत युवकाचा खून केला, असा जबाब नोंदविण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून या युवकांना जबर मारहाण करण्यात आली. याविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी राजू झोडे यांनी केली. वनजमिनीच्या अतिक्रमणाबाबत देखील वनविभाग आणि गावकऱ्यांचा संघर्ष समोर आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.