ETV Bharat / state

पुरवठा-वितरण व्यवस्थेवर प्रशासनाची करडी नजर

दारिद्र्य रेषेखालील कुंटुंबे, अंत्योदय व प्राधान्यक्रम शिधापत्रिकाधारकांना मिळणाऱ्या नियमित धान्याव्यतिरीक्त मोफत ५ किलो तांदूळ प्रती व्यक्ती मिळत आहे. तसेच दारिद्रय रेषेवरील केसरी कार्ड धारकांनाही २ किलो तांदूळ व ३ किलो गहू याप्रमाणे सवलतीच्या दरात २४ एप्रिलपासून धान्य वितरण सुरू करण्यात आले.

खांबाडा येथील रास्त भाव दुकानाची पाहणी करताना तहसीलदार नागटिळक व पाटील

author img

By

Published : May 1, 2020, 4:15 PM IST

चंद्रपूर - देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिक, गरीब, मजुरांवर होणाऱ्या प्रभावाचा विचार करता दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना नियमित पुरवठ्याव्यतिरिक्त प्रती व्यक्ती ५ किलो तांदूळ मोफत रास्त भाव दुकानातुन मिळत आहे. केशरी कार्डधारकांनाही सवलतीच्या दरात धान्य पुरवठा केला जात आहे. या सर्व वितरण व्यवस्थेवर प्रशासनाची करडी नजर असून चिमूर तालुकयातील ३ रास्त दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे.

देशात कोव्हिड-१९ कोरोना प्रादुर्भावावर आळा घालण्याकरिता देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आले. यामुळे देशातील सर्वप्रकारचे उद्योग धंदे, कारखाने व बाजारपेठा बंद आहेत. ज्याचा परिणाम देशातील गोरगरीब, मजूर, शेतमजूर व सामान्य नागरिकांना हाल सहन करावे लागत आहेत. यावर उपाय म्हणून राष्ट्रीय अन्नसुरक्षा अंतर्गत धान्य वितरणाचा लाभ घेणाऱ्या दारिद्रय रेषेखालील कुंटूब, अंत्योदय व प्राधान्यक्रम शिधापत्रिकाधारकांना मिळणाऱ्या नियमित धान्याव्यतिरीक्त मोफत ५ किलो तांदुळ प्रती व्यक्ती मिळत आहे. तसेच दारिद्र्य रेषेवरील केसरी कार्ड धारकांनाही २ किलो तांदूळ व ३ किलो गहू याप्रमाणे सवलतीच्या दरात २४ एप्रिलपासून धान्य वितरण सुरू करण्यात आले.

चिमूर तालुक्यामध्येही रास्त भाव धान्य दुकानातून वितरण सुरू आहे. यावर तहसील प्रशासनाची करडी नजर आहे. तालुक्यातील वहानगाव येथील रास्तभाव दुकानदाराकडून गरिबांच्या हक्काच्या धान्याची अफरातर करून काळाबाजार झाल्याने प्रशासनाकडून कठोर पावले उचलून परवाना रद्द करण्यात आला. विहीरगाव येथील रास्तभाव धान्य दुकानांच्या दस्तावेज व वितरणात अनियमितता आढळल्याने तसेच मिनघरी येथील रास्त भाव दुकान चालविणाऱ्या महिला बचत गटात समन्वय नसल्याने कारवाई करण्यात आली. संबंधित दुकानांना जवळच्या रास्त भाव दुकानास संलग्नित करण्यात आले आहे. प्रशासनाच्या या कठोर कारवाईने सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अफरातफरी, अनियमितता व काळाबाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.