ETV Bharat / state

Accident in Chandrapur : मजूर घेऊन जाणारी गाडी पलटी; एका महिलेचा मृत्यू, 11 जण जखमी

मुलवरुन गडचिरोली मार्गाच्या मुख्य हायवेने तेलंगाणात जात असताना आकापूर वळणावर कार (OD 03 M3197) ही गाडी अनियंत्रित होऊन पलटी ( Accident in Chandrapur ) झाली. कारमधील एक महिला ठार झाली असून बाकी 11 जण जखमी झाले.

Accident in Chandrapur
मजूर घेऊन जाणारी गाडी पलटी
author img

By

Published : Jan 11, 2022, 4:42 PM IST

चंद्रपूर - ओडिसावरून तेलंगाणा राज्यातील करीमनगर येथे कामानिमित्त कारने जाणाऱ्या मजूराची गाडी पलटी ( Accident in Chandrapur ) झाली. या अपघातात एका महिलेचा मृत्यू तर 11 जण जखमी झाल्याची घटना मूल-गडचिरोली मार्गावर आज सकाळी घडली. मजुरांना नेणारे हे वाहन होते.

11 जण गंभीर जखमी -

मुलवरुन गडचिरोली मार्गाच्या मुख्य हायवेने तेलंगाणात जात असताना आकापूर वळणावर कार (OD 03 M3197) ही गाडी अनियंत्रित होऊन पलटी झाली. कारमधील एक महिला ठार झाली असून बाकी 11 जण जखमी झाले. चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील दोन वर्षांपासून सुरु असून काम पूर्णत्वाच्या मार्गावर आलेले आहे. परंतु, आकापूर वळणावर रिफ्लेक्टर लावण्यात आले नसल्याने रस्ता माहीत नसलेल्या वाहन चालकांना रात्रोच्या वेळेस वळण असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळेच नेमका आकापूर वळणावरच हा भीषण अपघात घडला आहे. 11 जण गंभीर जखमी झाले असून जखमी कामगारांना तात्काळ मुल येथील उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

हेही वाचा - Chemical Factory Fire Bhusawal : भुसावळमध्ये केमिकल फॅक्टरीला भीषण आग; लाखोंचे नुकसान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.