चंद्रपूर- जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 972 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे, त्यांना कोरोनामुक्त घोषित करून रुग्णालयातून डीस्चार्ज देण्यात आला आहे,तर 553 कोरोना बाधित रुग्णांची नव्याने भर पडली असून 11 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 79 हजार 703 वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांची संख्या 70 हजार 987 आहे. सध्या 7 हजार 391 बाधितांवर उपचार सुरू आहे.आतापर्यंत 4 लाख 47 हजार 79 लोकांची कोरोना तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 64 हजार 465 लोकांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
चंद्रपूर आजचे मृत-
आज मृत झालेल्यांमध्ये चंद्रपूर शहरातील अंचलेश्वर गेट परिसरातील 70 वर्षीय पुरुष, 73 वर्षीय पुरुष, भिवापूर वार्ड येथील 20 वर्षीय पुरुष, घुगुस येथील 52 वर्षीय पुरुष,बल्लारपूर तालुक्यातील 45 वर्षीय पुरुष, भद्रावती तालुक्यातील 76 वर्षीय पुरुष, माजरी येथील 65 वर्षीय महिला, मूल तालुक्यातील 45 वर्षीय पुरुष, राजुरा तालुक्यातील 40 वर्षीय पुरुष, ब्रह्मपुरी तालुक्यातील खेड येथील 40 वर्षीय महिला, पळसगाव येथील 55 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
आजचे बाधित-
आज बाधित आलेल्या 553 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील 207, चंद्रपूर तालुका 46, बल्लारपूर 32, भद्रावती 43, ब्रम्हपुरी 33, नागभिड 13, सिंदेवाही 20, मूल 26, सावली 08, पोंभूर्णा 11, गोंडपिपरी 07, राजूरा 31, चिमूर 11, वरोरा 22, कोरपना 33, जिवती 03 व इतर ठिकाणच्या 07 रुग्णांचा समावेश आहे.
नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर करावा,वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षांवरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.