ETV Bharat / state

50 हजारांची खंडणी दे; अन्यथा...

author img

By

Published : May 17, 2020, 2:48 PM IST

Updated : May 17, 2020, 4:50 PM IST

गोपीचंद टेंभूरकर यांची गेल्या 35 वर्षांपासून येथील सात नाल्याला लागून 'सद्भावना भोजनालय' नावाचे हॉटेल आहे. ही हॉटेल अतिक्रमीत जागेत आहे. हे अतिक्रमीत हॉटेलच्या जागेचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.

गुन्हा दाखल (संग्रहित)
गुन्हा दाखल (संग्रहित)

चिमूर (चंद्रपूर) - 50 हजारांच्या खंडणीसाठी भोजनालयाच्या मालकाला धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भोजनालयाचे मालक गोपीचंद टेंभूरकर यांनी चिमूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

50 हजारांच्या खंडणीसाठी धमकी

काय आहे प्रकार?

गोपीचंद टेंभूरकर यांची गेल्या 35 वर्षांपासून येथील सात नाल्याला लागून 'सद्भावना भोजनालय' नावाची हॉटेल आहे. ही हॉटेल अतिक्रमीत जागेत आहे. हे अतिक्रमीत हॉटेलच्या जागेचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. लॉकडाऊन पूर्वी शेखर जनबंधू भोजनालयात ग्राहक म्हणुन आला होता. त्यांनी या जागेची विचारपुस केली. प्रकरण न्यायालयात सुरू असताना स्टे मिळाल्याच्या झेराक्स प्रती मागितल्या. त्याचा आधार घेऊन चंद्रपूर जिल्हाधिकारी यांचेकडे परस्पर अर्ज केला. त्यामुळे अर्जावर विचार करत जिल्हाधिकारी यांनी चिमूर उपविभागीय अधिकारी यांना अतिक्रमित जागेचा अहवाल मागितला. याची एक प्रत शेखर जनबंधू यांना देण्यात आली. यानंतर भोजनालय मालक गोपीचंद टेंभूरकर यांना पैशाची मागणी केली.

धमकीही दिली....

लॉकडाऊनच्या काळात हलाकीची परिस्थिती आहे, असे सांगून पाच हजार रुपये लाटले. हे काम फक्त एवढ्याच रक्कमेचे नाही तर आणखी 50 हजार रूपये दे, असा तगादा पुन्हा टेंभुरकर यांच्याकडे १३ मेपासून लावला. रक्कम न दिल्यास तुमचे रेस्टारंट तोडन्यासाठी उमरेडवरून बंदोबस्त मागवुन त्याची भरपाई तुमच्याकडुन सक्तीने वसुल करण्यात येईल, अशा धमकीचे संदेश पाठवित आहे.

या सर्व प्रकारामुळे भोजनालय मालक टेंभूरकर यांना धक्का बसला. शेखर जनबंधुमुळे माझ्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. वारंवार खंडणीची मागणी करण्यात येत आहे. यामुळे त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी चिमूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीची प्रतिलिपी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनाही पाठविण्यात आली आहे. चिमूर पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. तर पुढील तपास सुरू आहे.

Last Updated : May 17, 2020, 4:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.