चंद्रपूर - जगातील सर्वात उष्ण शहरांच्या यादीत चंद्रपूर आज (शुक्रवारी) पाचव्या स्थानावर होते. आज तब्बल 46.4 डिग्री इतक्या ( Heat Wave Chandrapur ) तापमानाची नोंद करण्यात आली आहे. विदर्भातील सर्वात उष्ण शहर ( Chandrapur ranks fifth in list of heat ) चंद्रपूर ठरले आहे. 50 वर्षांचा हा विक्रम यावर्षी तुटला. चंद्रपूर शहरात उन्हाळ्यात सूर्य नेहमीच आग ओकत असतो. येथे आजवर 48 डिग्री तापमानाची देखील नोंद झाली आहे. सामान्यतः एप्रिल महिन्यापासून उन्हात प्रचंड वाढ होते. मात्र यावर्षी पहिल्यांदाच मार्च महिन्यापासूनच चंद्रपूरचा पारा चढला असल्याचे दिसून आले. 31 मार्च रोजी तब्बल 44 डिग्री इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. आता पुन्हा एकदा उन्हाने कहर करणे सुरू केले आहे.
आज यावर्षीचे सर्वाधिक तापमान नोंदविण्यात आले आहे. 46.4 डिग्री तापमान होते. त्यामुळे चंद्रपूर हे जागतिक यादीत पाचव्या स्थानावर आले. अकोल्याचे तापमान 45.8, अमरावती 45, बुलढाणा 42.8, ब्रम्हपुरी 45.6, गडचिरोली 42.4, गोंदिया 43.8, नागपूर 45.3, वर्धा 45.5, वाशिम 43.5, यवतमाळ 45.2 डिग्री इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. दिवसेंदिवस तापमान वाढत असल्याने नागरिकांना दुपारी बाहेर पडणे आता कठिण झाले आहे.
हेही वाचा - Dilip Walase Patil : राज्यात 7 हजार पोलिसांची भरती प्रक्रिया सुरु होणार; गृहमंत्र्यांची माहिती