ETV Bharat / state

चंद्रपूर जिल्ह्यात 202 रुग्णांची कोरोनावर मात; 131 जणांवर उपचार सुरू - corona patients recovery rate in Chandrapur

जिल्ह्यामध्ये पहिल्या ४५ दिवसांमध्ये ५० कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यानंतर १६ दिवसांत १०० कोरोनाबाधित आढळले. त्यानंतर फक्त आठ दिवसांत १५० कोरोनाबाधित आढळले.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक
author img

By

Published : Jul 23, 2020, 6:43 PM IST

चंद्रपूर - जिल्ह्यात आज नवीन ९ कोरोबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३३३ झाली आहे. यापैकी २०२ जणांना उपचार करून कोरोनाचे कोणतेही लक्षण नसल्याने सुट्टी देण्यात आली आहे, तर जिल्ह्यात १३१ जणांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत.

नवीन कोरोनाबाधित व्यक्ती हा वार्ड क्रमांक १४ मधील ताडाळा रोड येथील ४८ वर्षीय व्यक्तीच्या संपर्कातून बाधित झाल्याचे पुढे आले आहे. येथील राईस मिल कामगारांच्या संपर्कात हे व्यावसायिक आल्याची नोंद आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथे काम करणाऱ्या सावली तालुक्यातील लोंधळी येथील २७ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. कारंजा लाड येथून परत आल्यानंतर संस्थात्मक विलगीकरणात हा तरुण होता.

मूल तालुक्यातील नांदगाव येथे कार्यरत असणारे मात्र चंद्रपूर शहरांमध्ये चोर खिडकी परिसरात राहणाऱ्या ५६ वर्षीय पुरुषाला श्वसनासंदर्भात आजार होता. त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा स्वॅब घेतला असता ते कोरोनाबाधित असल्याचे आढळले.

भद्रावती येथील जैन मंदिर परिसरात राज्य राखीव पोलीस दलातील विलगीकरणात असणाऱ्या पोलीस जवानांपैकी चार पोलीस जवानांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पोलीस लाईन येथे राज्य राखीव दलाच्या पोलीस जवानांना झालेली लागण लक्षात घेऊन काही जवानांना भ्रदावती येथे विलगीकरणात ठेवण्यात आले आहेत. त्यांच्यापैकी चाचणी घेतलेल्यामध्ये चार जण पुन्हा पॉझिटिव्ह निघाले आहेत. याशिवाय भद्रावती शहरातील यापूर्वी पॉझिटिव्ह ठरलेल्या नागरिकांचा कुचना येथील १५ वर्षीय मुलगा संपर्कातून पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले आहे.

चंद्रपूर शहरातील दांडिया मैदानाजवळ राहणाऱ्या ६० वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. श्वसनासंदर्भात आजारी असल्याने त्या वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्यांचा बुधवारी स्वॅब घेण्यात आला असताना कोरोना लागण झाल्याचे आज दिसून आले. जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३३३ झाली आहे.

कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढतोय..

जिल्ह्यामध्ये पहिल्या ४५ दिवसांमध्ये ५० कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यानंतर १६ दिवसात १०० कोरोनाबाधित आढळले. त्यानंतर फक्त आठ दिवसात १५० कोरोनाबाधित आढळले. तर २०० आणि २५० कोरोनाबाधित केवळ चार दिवसांच्या अंतराने आढळले. तर कोरोनाची रुग्णसंख्या ३०० वर केवळ ३ दिवसात पोहोचली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नाही. मात्र, कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी गरज नसताना घराबाहेर पडू नये, असे जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे. नागरिकांनी नेहमी मास्क वापरावा व शारीरिक अंतर ठेवत काळजी घेण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.