चंद्रपूर - आत्तापर्यंत एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नसलेल्या जिल्ह्यात अखेर आज (शनिवार) कोरोनाने शिरकाव केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
आत्तापर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण नव्हता. मात्र, आज एक कोरोनाचा रुग्ण सापडला आहे. रुग्णाचे वय साधारण 50 वर्षे असून, तो मूल मार्गावरील कृष्णनगर येथील रहिवासी आहे. त्याला काल अलगीकरण विभागात दाखल करण्यात आले होते. खोकला, श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्याची कोरोनाची चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला. याबाबतची अधिकृत माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी दिली.