ETV Bharat / state

चंद्रपूर जिल्ह्यात 177 कोरोनामुक्त; 88 पॉझिटिव्ह तर 2 मृत्यू

जिल्ह्यात 177 जणांनी कोरोनावर मात केली असून 88 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच 2 बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 83 हजार 965 वर पोहोचली आहे.

177 people discharge and 88 patient found positive in chandrapur
जिल्ह्यात 177 कोरोनामुक्त, 88 पॉझिटिव्ह तर 2 मृत्यू
author img

By

Published : Jun 11, 2021, 12:43 PM IST

चंद्रपूर - गेल्या 24 तासात जिल्ह्यात 177 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर 88 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच 2 बाधितांचा मृत्यू झाला आहे.

85 नवे बाधित आढळले
बाधित आलेल्या 88 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 37, चंद्रपूर तालुका 8, बल्लारपूर 13, भद्रावती 6, ब्रम्हपुरी 0, नागभिड 1, सिंदेवाही 2, मूल 0, सावली 0, पोंभूर्णा 1, गोंडपिपरी 0, राजूरा 7, चिमूर 1, वरोरा 8, कोरपना 3, जिवती 0 व इतर ठिकाणच्या 1 रुग्णांचा समावेश आहे. आज मृत झालेल्यांमध्ये चंद्रपूर शहरातील मातानगर, भिवापूर येथील 44 वर्षीय पुरुष तर राजुरा तालुक्यातील नाईक नगर येथील 74 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

एकूण बाधितांची संख्या 83 हजार 586 वर

जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 83 हजार 965 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची एकूण संख्या 81 हजार 296 झाली आहे. सध्या 1 हजार 179 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 5 लाख 6 हजार 559 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 4 लाख 19 हजार 527 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1490 बाधितांचा मृत्यू झाला असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 1,379, तेलंगाणा दोन, बुलडाणा एक, गडचिरोली 40, यवतमाळ 51, भंडारा 11, वर्धा एक, गोंदिया तीन आणि नागपूर येथील दोन बाधितांचा समावेश आहे.

प्रशासनाचे आवाहन

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रिसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

हेही वाचा - देशात गेल्या २४ तासांमध्ये ९१ हजार कोरोना रुग्णांची नोंद; ३,४०० जणांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.