चंद्रपूर - अपघात झाला की तो टाळण्यासाठी सर्वांगाने विचार न करता थेट गतिरोधक ( Speed Breaker In Chandrapur) तयार केले जातात. मात्र त्यालाही काही सीमा असणे आवश्यक आहे. पण जटपुरा गेट ते रामनगर या अवघ्या एक किलोमीटरच्या रस्त्यावर तब्बल 12 गतिरोधक ( 12 Speed Breaker Erected On Chandrapur Road ) उभारण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यासाठी कुठलीही मंजुरी घेण्यात आलेली नाही. या रस्त्यावर दिवसा अतिक्रमण केले जाते. मात्र याचा बंदोबस्त करण्याऐवजी गतिरोधक ( 12 Speed Breaker Erected On One Kilometer Road ) उभारल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
गतिरोधक हे अपघात टाळण्याचा उपाय नाही गतिरोधक हे अपघात टाळण्याचा हमखास उपाय नाही. म्हणूनच ते उभारण्यासाठी अनेक बाबींचा विचार केला जातो. कारण चुकीच्या पद्धतीने ते बांधल्यास उलट अपघात होण्याचीच शक्यता अधिक असते. रस्ते सुरक्षा समितीकडून गतिरोधक टाकण्यास परवानगी घ्यावी लागते. मात्र लोकप्रतिनिधी आपल्या अधिकारांचा गैरवापर करत असे गतिरोधक उभारण्यास दबाव आणतात आणि प्रशासनाचे अधिकारी देखील या दबावाला बळी पडत हे काम करतात. मात्र त्याच्या कुठल्याही निकषांचे पालन केले जात नाही. याच पद्धतीने चंद्रपूर नागपूर ( Speed Breaker ) महामार्गावर काही वर्षांपूर्वी गतिरोधक तयार करण्यात आले होते. यामुळे दुचाकी उसळून एका प्राध्यापकाचा मृत्यू झाला होता. मात्र तरीही हे थांबले नाही. रवी आसवानी हे चंद्रपूर महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती असताना आपल्या अधिकारांचा वापर करत त्यांनी आपल्या वॉर्डातील एका रस्त्यावर तब्बल 8 गतिरोधक तयार करायला लावले. तसेच आपल्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला त्यांनी हे दुभाजक तयार केले. अवघ्या शंभर ते दीडशे मीटर अंतरावर हे आठ गतिरोधक लावण्यात आले. त्यातच आता याच मार्गाने पुढे जाणाऱ्या जटपुरा गेटजवळ आणखी चार गतिरोधक तयार करण्यात आले.
माजी नगरसेवकांनी केले गतिरोधक तयार स्थानिक माजी नगरसेवकांनी पुढाकार घेत गतिरोधक ( 12 Speed Breaker Erected On Chandrapur Road ) तयार केले. देवेंद्र बेले आणि छबु वैरागडे हे या वॉर्डातील माजी नगरसेवक आहेत. लोकांच्या आग्रही सूचनेनुसार हे गतिरोधक तयार केल्याचे त्यांनी सांगितले. मात्र त्यांनी याबाबत कुठलीही परवानगी महापालिकेकडून घेतली नाही. मनपा आयुक्त विपीन पालिवाल यांच्याशी संपर्क केला असता याबाबत माहिती घेऊन सांगतो त्यांनी असे सांगितले. काही दिवसांपूर्वी याच रस्त्यावर एक भीषण अपघात झाला होता. मध्यरात्री सुरू असलेल्या इटनकर यांच्या पानटपरीच्या बाजूला उभे असलेल्या दोघांना भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने उडवले. यात एका मुलाला नाहक प्राण गमवावा लागला तर दुसरा गंभीर जखमी झाला.
औषधीपेक्षा उपाचार महाग रात्री बे रात्री पानटपऱ्या सुरू असल्याने तिथे अनेक शौकीन लोक वाहनांसोबत येत असतात. यात काही मद्यपी देखील असतात. या ठिकाणी रस्त्यावर वाहने उभी केली जातात. तसेच दिवसा देखील या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले असते मात्र त्यावर कारवाई करण्या ऐवजी गतिरोधक ( 12 Speed Breaker Erected On One Kilometer Road ) तयार करण्याचा सोप्पा उपाय शोधण्यात आला. यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास भोगावा लागत आहे. औषधीपेक्षा उपाचार महागात पडत असल्याचे चित्र येथे दिसून येत आहे.