ETV Bharat / state

चंद्रपूर : बाहेरून आलेल्या नागरिकांमुळे कोरोनाचा धोका वाढला, आत्तापर्यंत 12 पॉझिटिव्ह - चंद्रपूर कोरोना न्यूज

बाहेरून येणाऱ्या नागरिकांमुळे आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याचा धोका वाढला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात तब्बल 65 हजार नागरिक आले असून, 14 हजार 481 नागरिक हे निगराणीखाली आहेत.

chandrpur
चंद्रपूरमध्ये कोरोनाचा धोका वाढला
author img

By

Published : May 21, 2020, 5:27 PM IST

चंद्रपूर - बाहेरून येणाऱ्या नागरिकांमुळे आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याचा धोका वाढला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात तब्बल 65 हजार नागरिक आले असून, 14 हजार 481 नागरिक हे निगराणीखाली आहेत. 20 मेपर्यंत जिल्ह्यात दुपारपर्यंत केवळ 3 कोरोनाचे रुग्ण होते. मात्र, दुपारी दुर्गापूर येथील एक 55 वर्षीय रुग्ण आढळला. तर रात्री आणखी 9 जण पॉझिटिव्ह आले. हे 9 रुग्ण संस्थात्मक अलगीकरणात आहेत. यापैकी 5 जण वैद्यकीय महाविद्यालयात चंद्रपूर येथे उपचार घेत आहेत. तर 4 जण वन अकादमीच्या नव्या इमारतीत संस्थात्मक अलगीकरणात आहेत.

डॉ. कुणाल खेमणार, जिल्हाधिकारी

वन अकादमीमध्ये 19 मे रोजी संस्थात्मक अलगीकरण करण्यात आलेले चार नागरिक नाशिक जिल्ह्यातील मालेगाव एमआयडीसीमध्ये काम करीत होते. भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयाने हे 4 नागरिक पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यामुळे वन अकादमीमध्ये ठेवण्यात आले होते. हे चार नागरिक चिरोली (मूल), जाम (पोंभुर्णा) विसापूर (चंद्रपूर) विरवा (सिंदेवाही) परिसरातील आहेत. पुणे येथून वरोरा येथे आलेले पती-पत्नी, ठाणे येथून आरवटला आलेला एकवीस वर्षाचा युवक, दिल्लीवरून ब्रह्मपुरी तालुक्यात आलेला 21 वर्षीय युवक या सर्वांवर वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 65 हजार नागरिक बाहेरून आलेले आहेत. त्यातील 14 हजार नागरीक निगराणीखाली आहेत. त्यांची व्यवस्था आणि तपासणी करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. मात्र, अशाही वेळी कोरोनाचा शिरकाव होण्याचा धोका वाढला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.