ETV Bharat / state

चंद्रपुरात एकाच दिवशी आढळले ११ नवे कोरोनाबाधित; एकूण रुग्णांची संख्या ३९ वर - 11 new corona patient chandrapur

आतापर्यत 22 बाधित बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे 39 पैकी अॅक्टिव्ह बाधितांची संख्या आता 17 आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक
author img

By

Published : Jun 7, 2020, 10:09 PM IST

चंद्रपूर- जिल्ह्यामध्ये आज एकाच दिवशी 11 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. आता जिल्ह्यात कोरोनाबधितांची संख्या 39 झाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिली

पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये मुंबईवरून आलेला शास्त्री नगर चंद्रपूर येथील 31 वर्षीय पुरुष, नवी दिल्लीवरून आलेला गडचांदूर येथील 27 वर्षीय व्यक्ती, जळगाववरून आलेला नागभीड तालुक्यातील तळोधी येथील 36 वर्षीय व्यक्ती, यवतमाळवरून आलेला नागभीड तालुक्यातील पुनघाडा रिठ या गावातील 36 वर्षीय व्यक्ती, ओडीसा राज्यातून आलेला नागभीड तालुक्यातील विजापूर या गावातील 40 वर्षीय पुरुष, तसेच यवतमाळ येथून आलेला नागभिड शहरातील 45 वर्षीय पुरुष, तसेच ब्रह्मपुरी तालुक्यातील अड्याळ टेकडी येथील पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील दोन व्यक्तींसह ब्रह्मपुरी येथील कोविड-19 केअर सेंटरमधील संस्थात्मक अलगीकरणात असणाऱ्या एकूण 5 व्यक्तींचा समावेश आहे.

यापैकी अडयाळ टेकडी येथे आणखी आढळलेल्या 3 नागरिकांमध्ये मुंबईवरून आलेला 43 वर्षीय पुरुष व 27 वर्षीय युवकाचा समावेश आहे. तर गुजरातमधून आलेला पुंड सावली येथील एक व्यक्ती आहे. आतापर्यत 22 बाधित बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे 39 पैकी अॅक्टिव्ह बाधितांची संख्या आता 17 आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.