चंद्रपूर - जिल्ह्यात मागील २४ तासांत १०७१ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर ३७७ कोरोना बाधित रुग्णांची नव्याने भर पडली असून १७ बाधितांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात ६ हजार २४६ बाधितांवर उपचार सुरू -
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ८० हजार ६०० वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ७२ हजार ९९८ झाली आहे. सध्या ६ हजार २४६ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ४ लाख ५३ हजार ९८ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ३ लाख ६९ हजार ८८१ नमुने निगेटीव्ह आले आहेत.
आतापर्यंत १३५६ बाधितांचे मृत्यू -
आज मृत झालेल्यामध्ये ११ पुरुष व ६ महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १३५६ बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील १२५७, तेलंगणा दोन, बुलडाणा एक, गडचिरोली ३५, यवतमाळ ४५, भंडारा ११, वर्धा एक, गोंदिया दोन आणि नागपूर येथील दोन बाधितांचा समावेश आहे.
आज कुठे किती रुग्ण -
आजबाधित आलेल्या ३७७ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील १०३, चंद्रपूर तालुका २६, बल्लारपूर ४९, भद्रावती ३३, ब्रम्हपुरी २३, नागभिड १२, सिंदेवाही १४, मूल ८, सावली ६, पोंभूर्णा ५, गोंडपिपरी ६, राजूरा २८, चिमूर ९, वरोरा १७, कोरपना २८, जिवती ८ व इतर ठिकाणच्या २ रुग्णांचा समावेश आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन -
नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर पडू नये. मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रिसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच ४५ वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
हेही वाचा - जालन्यात एकाच महिलेला दोन वेगवेगळ्या लसींचे डोस; आरोग्य विभाग करणार चौकशी