ETV Bharat / state

जिल्ह्यात 107 नवे कोरोनाग्रस्त; दोघांचा मृत्यू - चंद्रपूर कोरोना बातमी

चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासांत 107 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

प्रातिनिधीक छायाचित्र
प्रातिनिधीक छायाचित्र
author img

By

Published : Nov 18, 2020, 7:05 PM IST

चंद्रपूर - जिल्ह्यात मागील 24 तासांत 107 नवीन कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली असून 61 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज (दि. 18 नोव्हेंबर) मृत झालेल्या बाधितांमध्ये रेल्वे कॉलनी चंद्रपूर येथील 80 वर्षीय पुरुष व भारळा (ता. वरोरा) येथील 50 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 277 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 257, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 11, यवतमाळ पाच, भंडारा आणि वर्धा येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या 107 बाधितांसोबत आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 17 हजार 951 वर पोहोचली आहे. तसेच 24 तासांत 61 बाधित कोरोनातून बरे झाल्याने सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 15 हजार 483 झाली आहे. सध्या 2 हजार 191 बाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 32 हजार 111 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 12 हजार 570 नमुने निगेटिव्ह आले आहेत. नागरिकांनी मास्क लावणे, हात धुणे तसेच सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचा अवलंब करून कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.