मुंबई - नेमेची येतो मग पावसाळा हील म्हण मुंबईच्या अवस्थेला चपखल बसणारी आहे. पावसाळा सुरू झाला की सखल भागात पाणी तुंबणे, वाहतूक विस्कळीत होणे, ट्राफिक जाम होणे या बाबी हमखास घडतात. यासाठी उपाययोजना म्हणून कोट्यावधी रुपयांचा खर्च केल्याचे प्रशासनाकडून सांगितले जाते तरीही मुंबईची तुंबई का होते ? खरा सवाल आहे.
यंदाही मुंबईची परिस्थिती भयावह झाली आहे. आजवर वीजेच्या झटक्यानं चार जीव गेले आहेत. कोट्यावधी रुपये खर्चूनही मुंबईची तुंबई का होते? या प्रश्नाचे उत्तर अजूनही प्रशासनाकडे नाही. मुंबईत झालेल्या पहील्या पावसातच जनजीवन विस्कळीत झालयं, आरोप विजय वेडट्टीवार यांनी केला.
कॉंग्रेस आणि शिवसेना आमदारांचे आरोप प्रत्यारोप
सखल भागात पाणी साचले आहे. प्रशासनाने पाणी तुंबू नये यासाठी नालेसफाईवर करोडो रुपयांचा खर्च केला होता. तरीदेखील ही अवस्था का झालीय हा सवाल विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वेडट्टीवार यांनी उपस्थित केला. नालेसफाईत भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही करण्यात आला.
या आरोपावर शिवसेनेचे आमदार आक्रमक झाले. नालेसफाईत भ्रष्टाचार झालाय हे रेकॉर्डवरुन काढून टाका अशी मागणी शिवसेनेचे आमदार आणि माजी महापौर सुनिल प्रभुंनी विधानसभेत केली.