मुंबई - मराठा आरक्षणासंबंधी मुंबई उच्च न्यायालयाने अंतिम निर्णय दिला. यामध्ये मराठा आरक्षण 12 ते 13 टक्के दिले जाऊ शकते, असे म्हणत गायकवाड समितीच्या अहवलानुसार मराठा समाज हा सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मागासलेला असल्याचे म्हटले आहे. यानंतर राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.
महाराष्ट्रातील अनेक राजकीय पक्षांनी या गोष्टीचे स्वागत केले आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत राजकीय नेते कोणत्या प्रतिक्रिया देत आहेत हे आपण पाहूयात.