ETV Bharat / state

जेट एअरवेजच्या अडचणीत वाढ, १ एप्रिलपासून वैमानिक संपावर - salary

पगार न मिळाल्याने जेट एअरवेजच्या १ हजारापेक्षा अधिक वैमानिकांनी १ एप्रिलपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

जेट एअरवेज११
author img

By

Published : Mar 30, 2019, 1:22 PM IST

मुंबई - आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजचे शुक्लकाष्ठ काही केल्या दूर होताना दिसत नाही. गेल्या काही महिन्यांचा पगार न मिळाल्याने जेट एअरवेजच्या १ हजारापेक्षा अधिक वैमानिकांनी १ एप्रिलपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

जेट एअरवेजच्या अध्यक्षपदावरुन नरेश गोयल व त्यांची पत्नी पायउतार झाल्यानंतर जेटच्या परिस्थितीत सुधारणा होईल, अशी चिन्हे होती. मात्र, अजूनही जेटच्या वैमानिकांचे पगार थकल्यामुळे जेट वैमानिकांची संघटना नॅशनल एव्हिएटर्स गिल्डने १ एप्रिलपासून विमान न उडविण्याचा निर्णय घेतला आहे.

जेटच्या ग्राहकांनी १ एप्रिलपासून तिकीट बुकिंग केली असेल तर वैमानिकांच्या संपाचा फटका ग्राहकांना बसणार आहे. त्यामुळे याचा फायदा प्रतिस्पर्धी असलेल्या स्पाईसजेट, इंडिगोसारख्या कंपन्यांना होणार आहे. सध्या जेट एअरवेजने आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी एसबीआय कॅपिटल मार्केटसारख्या संस्थेला सल्लागार म्हणून निवडले असून या माध्यमातून जेटमध्ये मोठी गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचा शोध घेतला जात आहे.

Intro:आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेज चे शुक्लकाष्ठ काही केल्या दूर होताना दिसत नाही. गेल्या काही महिन्यांचा पगार न मिळाल्याने जेट एअर वीज च्या 1000 हुन अधिक वैमानिकांनी 1 एप्रिल पासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला असल्याने आता यावर जेट च्या प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे.Body:जेट च्या अध्यक्षपदावरून नरेश गोयल व त्यांची पत्नी पायउतार झाल्यानंतर जेट च्या परिस्थितीत सुधारणा होईल अशी चिन्हे होती.मात्र अजूनही जेटच्या वैमानिकांचे पगार थकल्यामुळे जेट वैमानिकांची संघटना नॅशनल एविटर्स गिल्ड या संघटनेने 1 एप्रिल पासून विमान न उडविण्याचा निर्णय घेतला आहे. Conclusion:जेट च्या ग्राहकांनी येत्या 1 एप्रिल पासून तिकीट बुकिंग केली असेल तर वैमानिकांच्या संपाचा फटका ग्राहकांना बसणार आहे. याचा फायदा प्रतिस्पर्धी असलेल्या स्पाईस जेट , इंडिगो सारख्या विमान कंपन्यांना होऊन प्रवासी भाड्यात स्पर्धा या मुळे पाहायला मिळणार असून जेट सारख्या मोठ्या विमाणकंपनिला याचा सामना करावा लागणार आहे. सध्या जेट एअर वीज ने आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी एसबीआय कॅपिटल मार्केट सारख्या संस्थेला सल्लागार म्हणून निवडले असून याच्या माध्यमातून जेट मध्ये मोठी गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूक दारांचा शोध सध्या घेतला जात आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.