ETV Bharat / state

खडसे गहिवरले.. म्हणाले, खोटे आरोप करणाऱ्यांवर शिक्षेसाठी करा कायदा - भ्रष्टाचार

मी भ्रष्ट, नालायक आमदार आहे, हा शिक्का घेऊन मला बाहेर जायचे नाही, अशा शब्दात माजी मंत्री एकनाथ खडसेंनी त्यांच्या मनातील खदखद आणि भावनांना वाट मोकळी करुन दिली.

एकनाथ खडसे
author img

By

Published : Jul 2, 2019, 7:46 PM IST

Updated : Jul 2, 2019, 8:50 PM IST

मुंबई - 'उभं आयुष्य मी राजकारण केले. ४० वर्ष सतत निवडून आलो. मात्र, माझ्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपाने मला वेदना झाल्या आहेत. त्यामुळे मी भ्रष्ट, नालायक आमदार आहे, हा शिक्का घेऊन मला बाहेर जायचे नाही, अशा शब्दात माजी मंत्री एकनाथ खडसेंनी त्यांच्या मनातील खदखद आणि भावनांना विधानभवनात वाट मोकळी करुन दिली.

एकनाथ खडसे

माझ्यावर सभागृहाच्या बाहेर आरोप केले होते. माझ्यावरील आरोपाची चौकशी करण्याची मीच मागणी केली होती. दाऊदच्या बायकोशी बोलण्याचा माझ्यावर आरोप होता. पारदर्शी सरकारने चौकशी केली. माझ्यावर आरोप करणारा हॅकर मनीष भंगाळे कुठे आहे ते सांगा? माझ्या पीएने ३० लाखाची लाच घेतल्याचा आरोप खोटा निघाला. मी एक इंचही जागा घेतली नाही तरी आरोप झाले. दमानिया बाई रोज आरोप करायची. लाचलुचपत आणि आयकराची चौकशी झाली. मी पाटलाचा पोरगा असल्यामुळे शेती व्यतिरिक्त माझा दुसरा उद्योग नाही. शैक्षणिक संस्था नाही, असे खडसे म्हणाले.

मी विरोधी पक्षनेता असताना केलेल्या आरोपांबद्दल मी माजी मुख्यमंत्र्यांची माफी मागतो. त्यामुळे आरोप करताना नेहमी काळजी घेतली पाहिजे. मला पैसा कमी नाही. मी चोर असतो तर मला लोकांनी निवडून दिले नसते. खोटे आरोप करणाऱ्यांवर शिक्षा झाली पाहिजे. त्यासाठी कायदा करा. जीवनात कोणावरही अशी वेळ येता कामा नये, असेही ते यावेळी म्हणाले.

खडसेंनी आपल्या भावना व्यक्त केल्यानंतर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिर्घकाळाच्या चांगल्या भवितव्यासाठी अल्पकाळ त्रास सहन करावा लागतो, असे म्हणत खडसेंना धीर देण्याचा प्रयत्न केला.

Intro:Body:
MH_MUM_Eknath_Khadase__Vidhansabha_7204684

आधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी खडसे गहिवरले
म्हणाले..मी भ्रष्ट, नालायक आमदार आहे का?
मुंबई :'उभं आयुष्य मी राजकारण केलं; ४० वर्ष सतत निवडून येतोय. आरोपानं मला वेदना झाल्या.मी भ्रष्ट, नालायक आमदार आहे हा शिक्का घेऊन मला बाहेर जायचं नाही, अशा शब्दात माजी मंत्री एकनाथ खडसेंनी त्यांच्या मनातील खदखद आणि भावनांना वाट मोकळी करुन दिली.

खडसे म्हणाले,माझ्यावर सभागृहाच्या बाहेर आरोप केले होते. माझ्यावरील आरोपाची चौकशी करण्याची मीच मागणी केली होती. दाऊदच्या बायकोशी बोलण्याचा माझ्यावर आरोप होता.
उभं आयुष्य राजकारण केलं. ४० वर्ष निवडून येतोय. आरोपानं वेदना झाल्या.पारदर्शी सरकारने चौकशी केली. माझ्यावर आरोप करणारा हँकर मनीष भंगाळे कुठे आहे ते सांगा? नाथाभाऊच्या पीएनं ३० लाखाची लाच घेतल्याचा आरोप खोटा निघाला.नाथाभाऊनं एक इंचही जागा घेतली नाही: तरी आरोप झाले.दमानिया बाई रोज आरोप करायची, लाचलुचपत आणि आयकराची चौकशी झाली; मी पाटलाचा पोरगा. शेती व्यतिरीक्त माझा दुसरा उद्योग नाही. शैक्षणिक संस्था नाही असं खडसे म्हणाले.

मी विरोधी पक्षनेता असताना केलेल्या आरोपांबद्दल मी माजी मुख्यमंत्र्यांची माफी मागतो. त्यामुळं आरोप करताना नेहमी काळजी घेतली.
मला पैसा कमी नाही.राज्यातील बहुजन समाजाला माझ्या कुटुंबाला वेदना झाल्या. चोर असतो तर लोकांनी निवडून दिले नसते.. आता कायदा करा.खोटे आरोप करणाऱ्यांवर शिक्षा झाली पाहीजे.मला वेदना आहेत. कोणाच्याही जीवनात अशी वेळ येता कामा नये, असे खडसे म्हणाले.

यावर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले,दिर्घकाळाच्या चांगल्या भवितव्यासाठी अल्पकाळ त्रास सहन करावा लागतो. Conclusion:
Last Updated : Jul 2, 2019, 8:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.