ETV Bharat / state

पत्रकार परिषदेत मोदींचा चेहरा डाव हरलेल्या खेळाडूसारखा - डॉ. रत्नाकर महाजन - mumbai

मोदींचा चेहरा हा एखाद्या डाव हरलेल्या खेळाडूसारखा दिसत होता. तसे ते हरणारच आहेत. या पत्रकार परिषदेत खरे पंतप्रधान तडीपारच असावेत, असा कोणाचा ग्रह झाला असेल तर तो चुकीचा म्हणता येणार नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी
author img

By

Published : May 17, 2019, 8:52 PM IST

मुंबई - तब्बल ५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ अपवाद दूर करण्याच्या हेतूने अखेर पत्रकार परिषद घेतली. पत्रकारांना एकही प्रश्न न विचारु दिला नाही. पत्रकार परिषद घेण्याच्या हेतूलाच त्यांनी हरताळ फासला. पत्रकारांसमोर आत्मस्तुती करणारे आणि आपल्या कारकिर्दीबद्दल आपणच आपली पाठ थोपटून घेणारे एक भाषणच ठोकले, अशी टीका डॉ. रत्नाकर महाजन यांनी केली आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आणि प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन मोदींच्या पत्रकार परिषदेवर बोलताना म्हणाले, पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचे काम पक्षाचे तडीपार अध्यक्ष अमित शहा यांनी केले. त्यातही त्यांचा अंगभूत उद्धटपणा आणि आपल्या त्रुटी आणि अपयश झाकण्याचा प्रयत्न उठून दिसत होता.

पत्रकारांनासुद्धा तुम्ही व्यवस्थित बातम्या देत नाहीत आणि आमच्यावरील नको त्या आक्षेपांना प्रसिद्धी देता असेही सुनावले. त्यांच्या बाजूला बसलेल्या मोदींचा चेहरा हा एखाद्या डाव हरलेल्या खेळाडूसारखा दिसत होता. तसे ते हरणारच आहेत. या पत्रकार परिषदेत खरे पंतप्रधान तडीपारच असावेत, असा कोणाचा ग्रह झाला असेल तर तो चुकीचा म्हणता येणार नाही, असेही रत्नाकर महाजन म्हणाले.

Intro:मोदींचा चेहरा डाव हरलेल्या खेळाडूसारखा- रत्नाकर महाजनBody:
मोदींचा चेहरा डाव हरलेल्या खेळाडूसारखा- रत्नाकर महाजन

(संग्रहित फोटो वापरावा)

मुंबई, ता. १७ :
तब्बल पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ अपवाद दूर करण्याच्या हेतूने अखेर पत्रकार परिषद घेतली. तथापी पत्रकारांना एकही प्रश्न न विचारु देऊन त्यांनी ही पत्रकारपरिषद घेण्याच्या हेतूलाच हरताळ फासला. शिवाय पत्रकारांसमोर आत्मस्तुती करणारे आणि आपल्या कारकीर्दीबद्दल आपणच आपली पाठ थोपटून घेणारे एक भाषणच ठोकले, अशा शब्दात मोदींच्या पत्रकार परिषदेचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी समाचार घेतला.   
मोदींच्या पत्रकार परिषदेवर बोलताना डॉ. महाजन पुढे म्हणाले की, पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचे काम पक्षाचे तडीपार अध्यक्ष अमित शहा यांनी केले. त्यातही त्यांचा अंगभूत उद्धटपणा आणि आपल्या त्रुटी आणि अपयश झाकण्याचा प्रयत्न उठून दिसत होता. शिवाय पत्रकारांनासुद्धा तुम्ही व्यवस्थित बातम्या देत नाहीत आणि आमच्यावरील नकोत्या आक्षेपांना प्रसिद्धी देता असेही सुनावले. त्यांच्या बाजूला बसलेल्या मोदींचा चेहरा हा एखाद्या डाव हरलेल्या खेळाडूसारखा दिसत होता. तसा ते तो हरणारच आहेत. या पत्रकार परिषदेत खरे पंतप्रधान तडीपारच असावेत असा कोणाचा ग्रह झाला असेल तर तो चुकीचा म्हणता येणार नाही, असेही डॉ. महाजन म्हणाले.Conclusion:मोदींचा चेहरा डाव हरलेल्या खेळाडूसारखा- रत्नाकर महाजन
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.