मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाआघाडीत यायला हवे, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले होते. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि राज ठाकरे यांची भेट झाली. या भेटीमुळे मनसेला आघाडीसोबत घेण्याच्या राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
दादर येथील मनसे कार्यकर्ते विवेक जाधव यांच्या निवासस्थानी या दोघांची बैठक झाली. या भेटीत दोघांनी जवळपास दीड तास चर्चा झाल्याचे वृत्त आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे पूर्वी शिवसेना आणि मनसेच्या विरोधात भूमिका घेत असत. मात्र, त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत मतांचे विभाजन टाळण्यासाठी राज ठाकरे यांनी आघाडीसोबत यावे, असे मत व्यक्त केले होते.