ETV Bharat / state

बुलडाण्यातील अडीच हजार जिल्हा परिषद शिक्षकांना निवडणुकीचे कामे करण्याची सक्ती

author img

By

Published : Jan 28, 2020, 11:36 AM IST

राज्यातील इतर कोणत्याही जिल्ह्यात शिक्षकांना निवडणुकीची (बीएलओ) कामे दिलेली नाहीत. बुलडाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सगळ्या तालुक्यातील अडीच हजार शिक्षकांना ही कामे करण्याची सक्ती केली आहे. या निर्णयाला शिक्षकांनी विरोध केला आहे.

जिल्हा परिषद बुलडाणा
जिल्हा परिषद बुलडाणा

बुलडाणा - जिल्हा परिषदेच्या अडीच हजार शिक्षकांना निवडणुकीची (बीएलओ) कामे करण्याची सक्ती जिल्हा प्रशासनकडून केली जात आहे. या आदेशाला शिक्षक संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. अशैक्षणिक कामे शिक्षकांना दिली जाऊ नयेत यासाठी घेण्यात आलेल्या नियोजन समितीच्या बैठकीला शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांनी अचानक हजेरी लावली.

जिल्हा परिषद शिक्षकांना निवडणुकीची कामे करण्याची सक्ती

देशपांडे यांनी बीएलओसारखी अशैक्षणिक कामे शिक्षकांना न देण्याची विनंती पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे केली. यावर जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी या बाबीचा विचार केला जाईल, असे आश्वासन दिले.

हेही वाचा - यापूर्वी शिवसेना संविधानाप्रमाणे चालत नव्हती का? फडणवीसांचा चव्हाणांना टोला
राज्यातील इतर कोणत्याही जिल्ह्यात शिक्षकांना बीएलओची कामे दिलेली नाहीत. बुलडाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सगळ्या तालुक्यातील अडीच हजार शिक्षकांना ही कामे करण्याची सक्ती केली आहे. जे शिक्षक बीएलओच्या कामांना विरोध करतील त्या शिक्षकांवर कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत. या सक्तीला शिक्षक सेनेने जोरदार विरोध केला आहे. शिक्षकांना शाळाबाह्य कामे दिल्याने विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशाविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष रवी वाघ यांनी सांगितले.

Intro:Body:बुलडाणा:- जिल्ह्यातील जिल्हा परिषदेमधील प्राथमिक अडीच हजार शिक्षकाना बीएलओ ची काम करण्याची सक्ती जिल्हा प्रशासनकड़ून केल्या जात असल्याचे उघड झाले असून त्या आदेशाला शिक्षक संघटनानी तीव्र विरोध केला असून अशैक्षणिक कामे शिक्षकांना देऊन नका याकरिता आज शनिवारी 25 जानेवारीला झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीला अचानक शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यानी हजेरी लावत पालकमंत्री डॉ राजेन्द्र शिंगणे यांच्याकडे शिक्षकाना बीएलओ ची अशैक्षणिक काम देऊं नका अशी मागणी करीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याचे स्पष्ट केले यावर जिल्ह्याधिकारी सुमन चंद्रा यानी या बाबीचा विचार केला जाईल असे आश्वासन दिले

बाईट - श्रीकांत देशपांडे, शिक्षक आमदार

राज्यात कोणत्याही जिल्ह्यात शिक्षकाना बीएलओ ची कामे दिली गेल्या नसून फक्त बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील 13 ही तालुक्यातील अडीच हजार शिक्षकाना कामे करण्याची सक्ती केली आहे,जे शिक्षक बीएलओ च्या कामाना विरोध करेल त्या शिक्षकावर कार्रवाई करण्याच्या नोटीसा सुद्धा बजावल्य आहेत म्हणून या अशैक्षणिक कामाना आमचा सख्त विरोध असून या आदेशा विरोधात न्यायालयात जाणार असल्याचे शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष रवी वाघ यांनी माहिती दिलीय.

बाईट - रवि वाघ, जिल्हाध्यक्ष शिक्षक सेना

राज्यातील प्राथमिक शिक्षकाना अशैक्षणिक शिक्षकाना काम देऊ नये यामुळे शालेय विद्यार्थयाचे शैक्षणिक नुकसान होत आहे त्यामुळे शिक्षकानी अशैक्षणिक कामाना सक्त विरोध केला होता ,आता जिल्ह्या प्रशासनाने घेतलेल्या निर्णयात शासन काय बदल करते याकडे जिल्ह्यातील हजारो शिक्षकांचे लक्ष लागले आहे

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.