बुलडाणा - नुकताच पावसाळा सुरू झाला आहे. आता नदी-नाल्यांसह गावच्या-शहराच्या रस्त्यांवर पाणी साचते. अशा पाणी साचलेल्या बहुतांश डबक्यांत बेडकांची डराव-डराव सुरु असते. आजपर्यंत आपण पाहतो त्या बेडकांचा कलर हा फिक्कट हिरव्या स्वरुपाचा पाहत आलो आहोत. मात्र, आता एक नवलच घडल! बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात चक्क गडद पिवळ्या रंगाचे बेडूक आढळले आहेत. आजपर्यंत पाहत आलेल्या बेडकांपेक्षा काहीतरी वेगळेच बेडून पाहायला मिळाल्याने नागरिकांत वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
पिवळ्या बेडकांचा पाऊस पडल्याची अफवा
पाण्यामध्ये जसे वेगवेळे मासे दिसतात, तसे खामगाव शहरातील तलाव व पाणवठ्यावर हे पिवळ्या रंगाचे बेडूक आढळले आहेत. तसेच, पाऊसकाळ्यात वेगवेळ्या प्रकारचे मासे सापडतात, मग बेडूक का सापडणार नाही, असा प्रश्न काही नागरिकांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, मान्सूनपूर्व काळात पिवळ्या बेडकांचा पाऊस पडल्यासह हे बेडूक विषारी असल्याची अफवा सध्या परिसरात पसरली आहे. तसेच, अशा प्रकारचे बेडूक आढळल्यास अपशकून घडत असल्याची अफवाही पसरली आहे.