बुलडाणा - चार दिवसात झालेल्या दमदार पावसामुळे शहराला पाणी पुरवठा करणारे स्वर्गीय भोंडे जलाशय 100 टक्के भरल्याने परिसरातील 15 गावांचा वर्षभराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
इतिहासात पहिल्यादाच चार दिवसाच्या पावसाने हे धरण भरले आहे. 28 जून ते 2 जुलै पर्यन्त 25 ते 50 मिली मिटर पाऊस पडण्याच्या अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे पैनगंगा नदी काठावरील गावांमधील नागरीकांना सतर्क राहण्याबाबत इशारा देण्यात आला आहे.