बुलढाणा: राहुल गांधींची भारत जोडो यात्रा ही बुलढाण्याच्या उंबरठ्यावर आहे. अशातच भारत जोडो यात्रेवरून देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्यांच्या वाढदिवशीच लक्ष्य करत आमदार संजय गायकवाड यांनी नेहेरुंवर बोचरी टिका केली होती. यावर आज काँग्रेसच्या नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी पलटवार करत शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची अक्कल काडीत, त्यांना इतिहास माहिती नाही. त्यांनी इतिहासाचे वाचन करावं, अशी टीका करण्यासाठी ही अक्कल लागते, अशी परखडती टिका त्यांनी केली आहे.
काय म्हणाले होते संजय गायकवाड: राहुल गांधींची भारत जोडो यात्रा ही बुलढाण्याच्या उंबरठ्यावर आहे.अशातच भारत जोडो यात्रेवरून देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहेरू यांना लक्ष्य करत आमदार संजय गायकवाड यांनी काँग्रेसवर टिका केली आहे. ते म्हणाले पहिली गोष्ट भारत काही तुटला नाही भारत जोडायला,त्याच्यामुळ हे भारत जोडोचा अर्थच माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला प्रश्न पडला आहे,की भारत जोडता कशाला, ज्यावेळेच भारत जुळत होता त्यावेळेच नेहरुंनी पुरा भारत तोडून टाकला.
संजय गायकवाडांची टीका: आता प्रतिसाद मिळतो, तर 3 पक्ष मिळून त्याला जे समर्थन होतेय. आणि 3 पक्षाचे कार्यकर्ते येताय म्हणून चाललं सगळे असे म्हणत येणाऱ्या काळात निवडणुकीमध्ये लोक विकासाला मत देतात, लोक कामाला मत देतात,लोक चालण्या वागण्याला मत देतात आता राज्यातील सरकार देवेंद्र फडणवीस आणि आमचे मुख्यमंत्री यांचा काम इतका चांगला आहेय
राज्यातलाही आणि केंद्रातला ही सरकार: देशात मोदींचा काम इतका चांगला आहे. की यांच्यामुळे हे भेदरलेले आहे. हे घाबरलेले आहे. त्यांच्यामुळे यांना हे यात्रा काढायची गरज पडतीय आहे. याचा जनतेवर काहीच परिणाम होणार नाही. तुम्ही सत्तेमध्ये 55 वर्ष असतांना काय केलं, हा प्रश्न तुम्हाला लोक निवडणुकीत विचारताय, आणि त्याच्यामुळेच संपूर्ण देशामध्ये वाताहात चालली आहे. येणाऱ्या काळामध्ये राज्यातलाही आणि केंद्रातला ही सरकार लोक भाजप सेनेच देतील.