ETV Bharat / state

स्वतंत्र विदर्भासाठी शिवसेना हा पक्ष सर्वात मोठा अडथळा - वामनराव चटप - lok sabha

विविध विदर्भवादी पक्ष व संघटनांनी एकत्र येऊन हा महामंच स्थापन केला असून या अंतर्गत विदर्भातील सर्व १० लोकसभेच्या जागा लढवण्यात येत आहेत.

स्वतंत्र विदर्भासाठी शिवसेना हा पक्ष सर्वात मोठा अडथळा - वामनराव चटप
author img

By

Published : Apr 15, 2019, 1:35 PM IST

बुलडाणा - स्वतंत्र विदर्भ राज्याचा मुद्दा घेऊन विदर्भ निर्माण महामंच लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. मात्र, दुसऱ्या टप्यातील बुलढाणा मतदारसंघातील निवडणुकीसाठी विदर्भ निर्माण महामंचकडून उमेदवार उभा नसल्याने या मतदारसंघासाठी भाजप-सेना युती आणि काँग्रेस राष्ट्रवादी या आघाडीला पाडण्यासाठी मतदारांनी सद्सद्विवेक बुद्धीने मतदान करावे, किंवा नोटाचा वापर करावा, असे आवाहन विदर्भ निर्माण महामंचचे संयोजक माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांनी बुलडाणा जिल्हातील शेगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले. तर स्वतंत्र विदर्भासाठी शिवसेना हा पक्ष सर्वात मोठा अडथळा असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.

स्वतंत्र विदर्भासाठी शिवसेना हा पक्ष सर्वात मोठा अडथळा - वामनराव चटप

विविध विदर्भवादी पक्ष व संघटनांनी एकत्र येऊन हा महामंच स्थापन केला असून या अंतर्गत विदर्भातील सर्व १० लोकसभेच्या जागा लढवण्यात येत आहेत. विदर्भ निर्माण महामंचामध्ये विदर्भ राज्य आंदोलन समिती, विदर्भ राज्य आघाडी, आम आदमी पार्टी, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी (बीआरएसपी), विदर्भ माझा, शेतकरी संघटना, लोकजागर पार्टी, जनसुराज्य पार्टी, लोक जागर पार्टी, रिपाइं (खोरिप) आणि प्रॉवटिस्ट ब्लॉक ऑफ इंडिया यांचा समावेश आहे. मात्र, विदर्भातील बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार उभा करण्यात आला नाही. त्यामुळे येथील मतदारांनी काँग्रेस आणि भाजप दोघेही स्वतंत्र विदर्भ राज्य देण्यास टाळाटाळ करीत असल्याने दोघानांही मतदान न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Intro:Body:बुलडाणा: स्वतंत्र विदर्भ राज्याचा मुद्दा घेऊन विदर्भ निर्माण महामंच लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे मात्र दुसऱ्या टप्यातील बुलढाणा लोकसभा निवडणुकीसाठी विदर्भ निर्माण महामंचकडून उम्मेदवार उभा नसल्याने या मतदार संघासाठी भाजपा सेना युती आणि काँग्रेस राष्ट्रवादीचे या आघाडीला पाडण्यासाठी मतदारांनी सद्विवेक बुद्दीने मतदान करावे नाही तर नोटांचा वापर करावा असे आवाहन विदर्भ निर्माण महामंच चे संयोजक माजी आमदार ऍड वामनराव चटप यांनी बुलडाणा जिल्हातील शेगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.तर स्वतंत्र विदर्भासाठी शिवसेना हा पक्ष सर्वात मोठा अडथळा असल्याचे हि त्यांनी यावेळी सांगितले.

स्टेटमेन्ट - माजी आमदार ऍड वामनराव चटप (संयोजक)

Vo ; विविध विदर्भवादी पक्ष व संघटनांनी एकत्र येऊन हा महामंच स्थापन केला असून या अंतर्गत विदर्भातील सर्व १० लोकसभेच्या जागा लढवण्यात येत आहे. विदर्भ निर्माण महामंचामध्ये विदर्भ राज्य आंदोलन समिती, विदर्भ राज्य आघाडी, आम आदमी पार्टी, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी (बीआरएसपी), विदर्भ माझा, शेतकरी संघटना, लोकजागर पार्टी, जनसुराज्य पार्टी, लोक जागर पार्टी, रिपाइं (खोरिप) आणि प्रॉवटिस्ट ब्लॉक ऑफ इंडिया यांचा समावेश आहे. मात्र विदर्भातील बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी उम्मेदवार उभा न केला गेल्याने येथील मतदारांनी काँग्रेस आणि भाजप दोघेही स्वतंत्र विदर्भ राज्य देण्यास टाळाटाळ करीत असल्याने दोंघांनाही पाडण्याचे आवाहन त्यांनी केले.

बाईट - माजी आमदार ऍड वामनराव चटप (संयोजक)

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.