बुलडाणा - जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील बरफगाव येथील जिल्हा परिषद शाळेला ग्रामस्थांनी कुलूप ठोकले आहे. गेल्या 10 दिवसांपासून 2 शिक्षिका ह्या शाळेला दांडी मारत आहेत. ग्रामस्थांनी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षाच्या वतीने निवेदन देवूनही शिक्षिका हजर न झाल्यामुळे शाळेला ताळे ठोकण्यात आले आहे.
या शाळेमध्ये 1 ते 5 पर्यंत वर्ग आहेत. शाळेमध्ये मुख्याध्यापकासह एकूण 4 शिक्षक आहेत. मात्र, दररोज शाळेमध्ये दोनच शिक्षक हजर असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, याला कंटाळून सोमवारी या शाळेला शिवसेनेचे तालुकाध्यक्ष संतोष डिवरे व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षांनी कुलूप लावले. तसेच जोपर्यंत शाळेमध्ये 4 शिक्षक हजर होत नाहीत, तोपर्यंत शाळेचे कुलूप उघडणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली.