बुलडाणा- देशातील हैद्राबाद, उन्नाव येथील घटनेने समाज मन विषन्न झाले आहे. त्यातच राष्ट्रमाता माँ. जीजाऊंच्या मातृतीर्थ असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात अशाच घटनेची पुनरावृत्ती झाली. खेर्डा येथील अपंग महिलेची निर्घृण हत्या झाली होती. या पार्श्वभूमीवर काल (९ डिसेंबर) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध सामाजिक संघटनांनी निषेध व्यक्त केला.
जळगाव-जामोद तालुक्यातील खेर्डा या गावी अपंग महिलेची निर्घुण हत्या करण्यात आली होती. संपूर्ण मानवजातीला काळिमा फासनारी व राष्ट्रमाता माँ. जिजाऊंच्या जिल्ह्याला कलंकीत करणारी ही घटना होती. त्यामुळे जिल्ह्यातील बहुसंख्य संघटनांच्या वतीने खेर्डा येथील घटनेचा निषेध करण्यासाठी काल (९ डिसेंबर) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निर्दशने करण्यात आली. त्यानंतर प्राभारी निवासी उपजिल्हाधिकारी गौरी सावंत यांच्या मार्फत मुख्यमंत्री व देशातील सर्व प्रमुख नेत्यांना निवेदन पाठविण्यात आले.
अत्याचारांच्या घटनांची पुनरावृत्ती थांबविण्यासाठी निवेदनात पाच कलमी कार्यक्रम शासनास मागनी स्वरूपात सादर करण्यात आला आहे. त्यामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये देशात फक्त २ टक्के पीडितांना न्याय मिळाला तर ९८ टक्के प्रकरणात आरोपी निर्दोष झाल्याचे दुर्देवी चित्र देशात असल्याचे सांगण्यात आले आहे. आरोपींना शिक्षा होत नसल्यामुळेच घटनांची पुनरावृत्ती होत आहे. त्यामुळे महिलांवरील अत्याचारा प्रकरणी स्वतंत्र प्रशिक्षित पोलीस अधिकारी व सरकारी वकिलांच्या नियुक्त्या करने, टिव्ही. सिरीयल, जाहिराती आणि चित्रपटातील अश्लिल दृष्यांवर बंदी घालने, राज्यातील प्रत्येक शाळा व महाविद्यालयात पालक, विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यासाठी प्रशिक्षित ट्रेनर नेमने. आणि दैनंदिन मुलींना स्व रक्षनाच्या ट्रेनिंगसाठी एक तास राखीव ठेवने, पालकांनी मुला-मुलींवर कसे संस्कार टाकायचे या करिता शासनाकडून प्रबोधन सभांचे आयोजन करने अशा महत्वपूर्ण पाच कलमी कार्यक्रमाची मागनी निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी निदर्शनात आझाद हिंद संघटना, मात्रृतीर्थ रनरागीनी संघटना, जनसेवा मंच, महानायक विचार मंच, आझाद हिंद महिला संघटना, स्रीमुक्ती संघटना, शेतकरी मजूर संघटना, ग्रामसेवक संघटना, बहुजन महिला संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, भैरव फाऊंडेशन यांच्यासह विविध सामाजिक संघटनांनी सहभाग घेतला होता. निवेदनावर अँड. सतीशचंद्र रोठे, माधवराव हूडेकर, प्रा.शाहिनाताई पठाण, सौ.सूरेखाताई निकाळजे, वैशाली ठाकरे, इंदुमती लहाने, धनश्री काटीकर, एन.एच.पठाण, आदेश कांडेलकर, आदी लोकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
हही वाचा- सराफा दुकानातील लाखोंच्या दागिन्यांवर चोरट्यांचा भरदिवसा डल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद