ETV Bharat / state

Uddhav Thackeray : 'या' बोक्यांना खोक्याची भूक लागली होती म्हणून त्यांनी गद्दारी केली; बुलडाण्यात उद्धव ठाकरे कडाडले

शिवसेना उध्दव बाळासाहेब उद्धव ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज विदर्भ दौऱ्यावर होते. बुलढाण्या जिल्ह्यातील चिखलीतील जाहीर सभेत त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भर देत राज्यातील शेतकऱ्यांना एकवटण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना हात घालत, राज्य सरकारवर जोरदार टीका ( Uddhav Thackeray critics on State Government ) केली.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Nov 26, 2022, 8:00 PM IST

Updated : Nov 26, 2022, 9:22 PM IST

मुंबई/ बुलढाणा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी आता बुलढाणा येथील चिखली मध्ये जाहीर सभा घेऊन सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका ( Uddhav Thackeray critics on State Government ) केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी अतिशय जोशपूर्ण भाषण केले विशेष म्हणजे शेतकऱ्यांना विविध दाखले देत आणि सरकारमधील मंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याचे पुरावे देत त्यांनी जनसमुदायाला विश्वास देण्याचा प्रयत्न केला.

उद्धव ठाकरे बुलढाण्या जिल्ह्यातील चिखलीतील जाहीर सभेत बोलताना

गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही - गोरगरीब मतदारांनी रक्ताचे पाणी करून गद्दारांना लोकसभेत व विधानसभेत पाठवले होते. आज त्या रक्ताची किंमत तुम्ही विसरलात, त्या निष्ठेची तुम्ही माती केली.आणि काही तरी मिळतेय म्हणून तुम्ही तिकडे गेलात, यामुळे तुम्हाला तात्पुरते मंत्रीपद मिळाले असेल पण तुमच्या आणि तुमच्या कुटुंबावरच्या कपाळावरचा गद्दार हा शिक्का आयुष्यामध्ये कधीच पुसला जाणार नाही, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाचे नाव न घेता ( Uddhav Thackeray critics on Shinde group ) केला.

शिंदे गटावर जोरदार टीका - कॉंग्रेससोबत गेलो तर आम्ही हिंदुत्व सोडले आणि तुम्ही जम्मू काश्मिरमध्ये मेहबूबा मुफ्ती यांच्यासोबत युती केली तेव्हा तुमचे हिंदुत्व कुठे होते, असा प्रश्न त्यांनी बंडखोरी केलेल्या नेत्यांना विचारला. हिंदुत्वाचा मुद्दा हे बंडखोरीचे कारण नसून या बोक्यांना खोक्याची भूक लागली होती म्हणून त्यांनी तुमच्याशी व आमच्याशी गद्दारी केली, अशी जोरदार टीका उद्धव ठाकरे यांनी केली. कामाख्या देवीच्या दर्शनाला जाऊन महाराष्ट्रातल्या देवतांचा एक प्रकारे अपमान केल्याची भावना जनमानसात रुजवण्यात काम एकप्रकारे ठाकरे यांनी केले.

शेतकऱ्यांच्या वीजबिलांविषयी चर्चा - ग्रामीण भागातील जनतेमध्ये पक्षाविषयी विश्वास निर्माण करताना त्यांनी अनेक उदाहरणे दिली. ज्यामध्ये बुलढाणा येथील एका शेतकऱ्याला अडीच एकर सोयाबीन पेरून सुद्धा कसे 33 रुपये पदरी पडले याची वाच्यता केली. यामुळे शेतकऱ्यांविषयी माहिती आणि कणव असलेला नेता ही प्रतिमा तयार होऊ शकते. शेतकऱ्यांच्या वीजबिलांविषयी चर्चा करून त्यांनी वातावरण निर्मिती केली तर पिक विमा संदर्भात महत्त्वाचा प्रश्न आहे हे जाणून शेतकऱ्यांच्या भावनांना थेट हात घातला. शेतकऱ्यांना आव्हान करत ते म्हणाले की, तुम्हाला आता नाउमेद होऊन चालणार नाही, मागील वर्षी ज्याप्रकारे पंजाबच्या शेतकऱ्यांना झुकवले त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या मनगटाची ताकद सरकारला दाखवून द्या.

हिंदुत्व सोडलेलं नाही - गद्दार निघून गेल्यानंतर आता नवीन पिढीने शिवसेनेत प्रवेश केला आहे. याचं कारण आम्ही हिंदुत्वावर कुणाला फसवलं नाही. शिवसेना या पक्षाची ओळख हिंदुत्ववादी पक्ष अशी होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेल्यामुळे शिवसेनेने हिंदुत्व सोडले अशी टीका भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाने केली आहे. याला प्रतिउत्तर देत शिवसेना ही हिंदुत्ववादीच आहे हे सांगताना बाबरी मज्जिद अमरनाथ यात्रा यांचा पुन्हा एकदा ठाकरे यांनी दाखला दिला. शिवसेनेने हिंदुत्व सोडलेले नाही, हे लोकांच्या मनावर ठसवण्याचा त्यांनी प्रयत्न करताना औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामकरणावर भर दिला.

शिंदे गटाच्या गद्दारीवर भर - दरम्यान शिंदे गटामध्ये गेलेले आमदार हे गद्दार आहेत. याचा सातत्याने पुनरुच्चार करून जनतेच्या मनामध्ये त्यांची गद्दार ही प्रतिमा अधिक ठळक करण्याचा ठाकरे यांनी पुन्हा एकदा या सभेत प्रयत्न केला. कामाख्या देवीच्या दर्शनाला जाऊन महाराष्ट्रातल्या देवतांचा एक प्रकारे अपमान केल्याची भावना जनमानसात रुजवण्यात काम एकप्रकारे ठाकरे यांनी केले.

मराठी अस्मितेला साद - बुलढाणा हा जिल्हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जिजाऊ यांचे माहेर. त्यानिमित्ताने मराठी अस्मितेला पुन्हा एकदा साथ घालताना छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्रात राज्यपाल आणि भाजपाकडून कसा पुन्हा पुन्हा अवमान होतो आहे हे दाखवून देत बुलढाण्यातल्या आणि एकूणच महाराष्ट्रातल्या जनतेच्या मराठी अस्मितेला छत्रपती शिवरायांबद्दल च्या भावनेला पुन्हा एकदा चुचकारण्याचा प्रयत्न या निमित्ताने ठाकरे यांनी केल्याचं पाहायला मिळालं.

Last Updated : Nov 26, 2022, 9:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.