ETV Bharat / state

इंग्लंडहून बुलडाण्यात आलेले 2 जण कोरोना पॉझिटिव्ह

जिल्ह्याची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. इंग्लंड येथून आलेल्या दोन जणांचा कोरोना अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे आरोग्य विभागासह जिल्हावासियांची चिंता वाढली आहे.

Corona Review
प्रतिकात्मक
author img

By

Published : Dec 27, 2020, 10:14 PM IST

बुलडाणा - जिल्ह्याची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. इंग्लंड येथून आलेल्या दोन जणांचा कोरोना अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे आरोग्य विभागासह जिल्हावासियांची चिंता वाढली आहे.

माहिती देताना निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश टापरे

नवीन नियमानुसार पुन्हा तपासले स्वाब

जिल्ह्यातील दोन व्यक्ती हे इंग्लंडवरून परत आले. भारतात दाखल होताच त्यांची मुंबई विमानतळावर 21 डिसेंबर रोजी आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. त्यानंतर ते खामगाव येथे 22 डिसेंबर रोजी आपल्या घरी पोहोचले. मात्र, ब्रिटेनमध्ये आलेल्या कोरोनाच्या नवीन स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर बाहेर देशातून आलेल्या सर्व नागरिकांच्या चाचण्या केल्या जात असल्याने या दोघांचेही स्वॅब घेण्यात आले. यात त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून दोघांनाही रुग्णालयात अलगीकृत करण्यात आले आहे. या दोघांना नेमका कोणता स्ट्रेन आहे, हे तपासण्यासाठी त्यांचे स्वॅब आज पुण्याला पाठविण्यात आले आहेत.

हेही वाचा - ...अन्यथा होणार नक्षलवादी, विद्यार्थ्याने मुख्यमंत्र्यांकडे मागितली आत्महत्येची परवानगी

संपर्कात आलेल्यांचे स्वाब गोळा केले जात आहे

इंग्लंडवरून आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचेही स्वॅब गोळा करणे सुरू आहे. सद्या 6 जणांचा शोध घेण्यात आला असून संपर्कात आलेल्या आणखी काहींचा शोध सुरू आहे. दोन्ही कोरोनाग्रस्त नवीन कोरोना विषाणूने ग्रस्त आहेत की नाही, हे पुण्यातून अहवाल आल्यानंतरच कळेल. त्यांचे स्वॅब पुणे येथील एनआयव्ही रुग्णालयाला पाठवण्यात आले आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता सुरक्षित राहाण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते व खामगाव निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश टापरे यांनी केले.

हेही वाचा - वीज बिले माफ करण्यासाठी विदर्भवाद्यांचा ४ जानेवारीला उर्जामंत्र्यांच्या निवासस्थानाला घेराव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.