बुलडाणा - बिबी गावाजवळ मुंबई-नागपूर महामार्गावर दुचाकी व नॅनो कारचा समोरासमोर भीषण अपघात झाला. ही घटना काल दुपारी घडली. या घटनेत दोन जण ठार व दोन जण जखमी झाले आहेत. मनप्रित तेजिंदर सिंह नारंग व अक्षय राऊत, असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तसेच, नॉनोकार मधील निकीता राऊत व मुलगा श्री राऊत हे गंभीर जखमी झाले.
हेही वाचा - हमरी-तुमरी प्रकरणी मोहम्मद सज्जाद यांच्या माफीने कामबंद आंदोलन मागे
बिबी पोलीस स्टेशन हद्दीतील बिबी ते पिंप्री खंदारे या गावाजवळ मुंबई-नागपूर महामार्गावर दुचाकी (क्र. एम एच 47 एम 1300) जालनाच्या दिशेने जात होती, तर नॅनो कार (क्र.एमएच 32 वाय 5238) मेहकरच्या दिशेने जात होती. दरम्यान दुचाकी व नॅनो कारमध्ये समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये दुचाकीस्वार मनप्रित तेजिंदर सिंह नारंग हा जागीच ठार झाला, तर नॅनो कार मधील अक्षय राऊत यांचा उपचारादरम्यान ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झाला. तर, नॅनोकार मधील मृतक अक्षय यांच्या पत्नी निकीता राऊत व मुलगा श्री राऊत हे दोघेही गंभीर जखमी झालेत. जखमींना पुढील उपचारासाठी जालन्याला हलविण्यात आले आहे.
हेही वाचा - शाळेला जात असताना विहिरीत पडून विद्यार्थीनीचा मृत्यू