बुलडाणा : जिल्ह्यातील मोताळा येथे मॉर्निंग वॉक करणाऱ्या तीन जणांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याची घटना समोर आली आहे. यात दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमींवर सामान्य रुग्णालयात उपचार केले जात आहेत.
डिडोळा फाट्यावर अपघात
मोताळातील डिडोळा फाट्याजवळ एका अज्ञात वाहनाने मॉर्निंग वॉक करणाऱ्या तिघांना उडविल्याची घटना घटना शुक्रवारी सकाळी घडली. यात दोघांचा मृत्यू झाला. तर एकाला गंभीर अवस्थेत सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. घटनेतील अज्ञात वाहनाचा चालक फरार असून बोराखेडी पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मलकापूर-बुलडाणा राज्य मार्गावरील मोताळा फाट्यापासून अनेक नागरिक नियमितपणे सकाळी फिरायला जातात. शुक्रवारी सकाळी 6 वाजेदरम्यान मॉर्निंग वॉक करणाऱ्या अमोल नानाजी गाढे (वय 19) रा.डिडोळा, दीपक कायस्थ (वय 40) न. प. कर्मचारी मोताळा, रा. देऊळगाव राजा व कमलेश शिवाजी जुनारे ( वय 19) रा. डिडोळा या तिघांना अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. यात अमोल गाढे व दीपक कायस्थ या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर कमलेश जुनारे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने बुलडाणा येथील रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
हेही वाचा - बस-कंटेनरचा भीषण अपघात; जागीच 7 ठार, 13 जखमी