ETV Bharat / state

कोविड चाचणी न करताच रुग्णांवर उपचार प्रकरणात लवकरच कारवाई - जिल्हा शल्य चिकित्सक

कोविडची नोंदणी नसणाऱ्या खासगी रुग्णालयांनी कोविडचे रुग्ण उपचारासाठी भरती करून नये आणि असे आढळल्यास कारवाई करण्याचा इशाराही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तडस यांनी दिला.

बुलडाणा
बुलडाणा
author img

By

Published : Apr 29, 2021, 10:33 PM IST

बुलडाणा - जिल्ह्यात सध्या गाजत असलेल्या खामगाव येथील डॉ. आशिष अग्रवाल यांच्या लाईफ लाईन रुग्णालयात दोन रुग्णांचे मृत्यू प्रकरण आणि मान्यता नसताना कोविडच्या रुग्णांवर रेमडेसिवीर या इंजेक्शनचा केलेला वापर, याबाबत गंभीर स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त झाल्या. सदर प्रकरणी 'ईटीव्ही भारत'ने सत्यता बाहेर आणल्याने डॉ. आशिष अग्रवाल यांच्या लाईफ लाईन रुग्णालयाची चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल मला असे वाटते आज गुरुवारी 29 एप्रिलच्या सायंकाळपर्यंत मिळणार असून उद्या (शुक्रवारी 30 एप्रिल)पर्यंत या प्रकरणात कारवाई होईल, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तडस यांनी दिली. सोबतच कोविडची नोंदणी नसणाऱ्या खासगी रुग्णालयांनी कोविडचे रुग्ण उपचारासाठी भरती करून नये आणि असे आढळल्यास कारवाई करण्याचा इशाराही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तडस यांनी दिला.

बुलडाणा
काय आहे प्रकरण -बुलडाणा जिल्ह्यात कोविड रुग्णांच्या जीवाशी खेळ कशा प्रकारे सुरू सुरू आहे. हे एक नव्हे तर अनेक धक्कादायक प्रकारातून समोर आले आहे. खामगावच्या डॉ. आशिष अग्रवाल यांनी आपले खासगी लाईफ-लाईन या रुग्णालयामध्ये चक्क कोरोना टेस्ट न करता शेगांवातील 35 वर्षीय सिद्धार्थ दाभाडे नामक रुग्णाला रेमडीसीवीरचे डोज दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यातच या रुग्णाचा मृत्यू झाला असून मृत्यू झालेल्या रुग्णाचा सिटीस्कॅनमधील एचआर सिटी अहवालामध्ये कोरोनाचा 25 पैकी 20 चा स्कोर आल्यानंतरही प्रोटोकॉल प्रमाणे मृतदेह न देता सर्व सामान्य आजाराने मृत्यू झालेल्या सारखा मृतदेह अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे अंत्यसंस्कारानंतर मृतकाचे चारही नातेवाईक कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने एकच खळबळ उडाली होती. याची तक्रार मृतकाचे नातेवाईक डॉ. प्रकाश दाभाडे यांनी केलेली आहे. तर यांनतर याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या एका 73 वर्षीय जयश्री विजय बोबडे नामक वृद्ध महिला रुग्णाची पुन्हा कोविड चाचणी न करताच न्यूमोनियाचे रुग्ण सांगून त्याच्यावर उपचार करण्यात आले असून त्यांचे देखील उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचा प्रकार पुन्हा समोर आला. धक्कादायक म्हणजे या रुग्णांला 14 रेडिसीविर इंजेक्शन लावण्यासाठी प्रिकॅशन लिहून दिले गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिवाय 3 दिवसाच्या उपचाराचे अडीच लाख रुपये बिल काढल्याचे आरोपही करून डॉ. अग्रवाल यांच्यावर कारवाई करण्यासाठी मृतक वृद्ध महिलेच्या मुलगा योगेश बोबडे यांनी तक्रार केली आहे. या दोन्ही प्रकरणात रुग्णाच्या नातेवाईकांनी आरोग्य विभागाकडे तक्रारी दाखल केल्यानंतर आणि हा धक्कादायक प्रकार ईटीव्ही भारतने समोर आणल्यानंतर आरोग्य प्रशासनाने डॉ आशिष अग्रवाल यांची चौकशी सुरू केली असून उद्या (शुक्रवारी 30 एप्रिल) पर्यंत या प्रकरणात कारवाई करणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तडस यांनी आज गुरुवारी दिली.नोंदणीकृत कोविड रुग्णालयांनाच नियमावलीनुसार रेडिसीविर इंजेक्शन देण्याचे अधिकार-जे कोविड नोंदणीकृत खाजगी रुग्णालय आहे.अशाच रुग्णालयांना रुग्णाला कधी व कोणत्या क्षणी रेडिसीविर इंजेक्शन द्यायचे आहे. यासाठी शासनाने वेळोवेळी नियमावली जाहीर केली आहे.त्या नियमानुसार कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर रेमडीसीविर इंजेक्शन घ्यावे लागते.आणि पॉझिटिव्ह रुग्णांना कधी रेडिसीविर इंजेक्शन द्यावे लागते.यासाठी ही नामावली आहे.त्याप्रमाणेच नोंदणीकृत खाजगी रुग्णांना मान्यता आहे.ही जर परवानगी त्या रुग्णालयाला नसेल आणि त्यांनी रेडिसीविर वापरला असेल,याबाबद्दल निश्चित कारवाई करण्यात येईल.खांमगावचा प्रकरण जे सध्या गाजत आहे.त्याची चौकशी आप ताबडतोब लावण्यात आलेली आहे.याच्यामध्ये मान्यताप्राप्त ते रुग्णालय नसेल तर त्या आरोपीची गय करणार नाही.एवढी मी ग्वाही देतो अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नितीन तडस यांनी दिली.तालुकास्तरीय समितीकडे करा मान्यताप्राप्त नसलेल्या रुग्णालयाची तक्रार -

प्रत्येक तालुक्यावर एक त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये तहसीलदार, तालुका वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधीक्षक यांचा समावेश आहे. सदरची समिती ही रुग्णालय नोंदणीकृत आहे की, नाही हे वेळोवेळी तपासण्याचे काम करत असते. एखाद्या रुग्णांना व कुणाला काही तक्रार असेल तर या समितीच्या कोणत्याही सदस्याकडे लेखी स्वरूपात तक्रार करावी. तक्रारींमधील रुग्णालय मान्यता प्राप्त नाही असं आढळून आले तर त्याच्यावर लगेच करवाई करण्यात येईल, असा इशारा देत कोणीही विनापरवानगी कोविडचा रुग्ण दाखल करून घेऊ नये, सांगत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस आवाहन केली की, ज्यांना रीतसर परवानगी घ्यावी असेल तर त्यांचा प्रस्ताव रितसर आमच्या कार्यालयात दाखल करावा. युद्ध पातळीवर आम्ही त्याला परवानगी देऊ असे सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.