बुलडाणा - अमरावती परिक्षेत्राचे उप महानिरीक्षक चंद्र किशोर मीणा यांच्या आदेशाने बुलडाणा जिल्ह्यातल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख महेंद्र देशमुख व साखरखेर्डाचे ठाणेदार संग्राम पाटील यांच्यासह 17 अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
जिल्ह्यात प्रशासकीय बदल्यांचे सत्र अजून थांबलेले नाही. जिल्हा पोलीसदलात एकापाठोपाठ बदल्या होत आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे व इतर विभागात कार्यरत अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.यामध्ये साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवर्गाचे विक्रांत पाटील, संग्रामसिंग पाटील, जनार्दन शेवाळे, मालती कायटे तसेच पोलीस उपनिरीक्षक इमरान इनामदार, मुकुंद देशमुख, मच्छिंद्रनाथ भालेराव, सुलभा ढोले, योगेश जाधव, अझहर शेख, रामेश्वर कांडूरे, घनशाम पाटील, दिलीप पाटील, भास्कर तायडे, महेश भोसले व मनोज सुरवाडे यांचा समावेश आहे. या पोलीस अधिकाऱ्यांची बदली अमरावती परिक्षेत्र अंतर्गत करण्यात आली आहे. बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख महेंद्र देशमुख व साखरखेर्डाचे ठाणेदार संग्राम पाटील यांची बदली अकोला येथे झाली आहे. तर इतर जिल्ह्यातून अनेक अधिकारी बुलडाणा जिल्ह्यात नव्याने येणार आहेत.