बुलडाणा - जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी बसलेल्या अंबाबरवा अभयारण्यामध्ये जंगल सफारी करण्यासाठी गेलेल्या खामगाव येथील पर्यटकांना शुक्रवारी 19 मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास अभयारण्यामध्ये जंगल सफारी करत असताना चक्क वाघाचे दर्शन झाले. यावेळी त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये या वाघाची छायाचित्रेही घेतली. ही छायाचित्रे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
वाघाचे दर्शन झाल्यामुळे पर्यटकांमध्ये आनंद व्यक्त करण्यात आला. जंगल सफारी दरम्यान त्यांच्यासोबत गाईड म्हणून वसाळी येथील सुमित पालकर हे होते. अंबाबरवा अभयारण्यामध्ये मोठ्या प्रमाणात जंगली प्राणी आहेत त्यामध्ये अस्वल, वाघ, बिबट, हरण, रानम्हशी, नीलगाय असे अनेक प्राणी आहेत.
संग्रामपूर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी आहे अंबाबरवा -
बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी बसलेल्या अंबाबरवा अभयारण्यामध्ये जंगल सफारीसाठी पर्यटक दररोज येत असतात. वसाळी येथे शासनाने इको सायन्स पार्क तयार केले आहे. त्यामध्ये पर्यटकांना राहण्याची व जेवणाची अल्प दरामध्ये सोय करण्यात आलेली आहे. तसेच या पार्कमध्ये कुत्रिम प्राण्यांचे पुतळे निर्माण करण्यात आलेले असून सोबतच लहान मुलांना खेळण्यासाठी सुविधा देण्यात आली आहे. मुख्य मार्गवरती इको सायन्स पार्क येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळाही बसवण्यात आलेला आहे. या सर्व बाबींमुळे अनेक पर्यटक वासाळी येथे अंबाबरवा अभयारण्यमध्ये जंगल सफारी करण्यासाठी येत असतात.अशातच खामगाव येथील पर्यटकांना शुक्रवारी 19 मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास अभयारण्यामध्ये जंगल सफारी करत असताना वाघाचे दर्शन झाले.
बुलडाण्याच्या अंबाबरवा अभयारण्यात पर्यटकांना झाले वाघोबाचे दर्शन.. - अंबाबरवा अभयारण्यात पर्यटकांना झाले वाघोबाचे दर्शन
बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी बसलेल्या अंबाबरवा अभयारण्यामध्ये जंगल सफारी करण्यासाठी गेलेल्या खामगाव येथील पर्यटकांना शुक्रवारी 19 मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास अभयारण्यामध्ये जंगल सफारी करत असताना चक्क वाघाचे दर्शन झाले.
बुलडाणा - जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी बसलेल्या अंबाबरवा अभयारण्यामध्ये जंगल सफारी करण्यासाठी गेलेल्या खामगाव येथील पर्यटकांना शुक्रवारी 19 मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास अभयारण्यामध्ये जंगल सफारी करत असताना चक्क वाघाचे दर्शन झाले. यावेळी त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये या वाघाची छायाचित्रेही घेतली. ही छायाचित्रे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
वाघाचे दर्शन झाल्यामुळे पर्यटकांमध्ये आनंद व्यक्त करण्यात आला. जंगल सफारी दरम्यान त्यांच्यासोबत गाईड म्हणून वसाळी येथील सुमित पालकर हे होते. अंबाबरवा अभयारण्यामध्ये मोठ्या प्रमाणात जंगली प्राणी आहेत त्यामध्ये अस्वल, वाघ, बिबट, हरण, रानम्हशी, नीलगाय असे अनेक प्राणी आहेत.
संग्रामपूर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी आहे अंबाबरवा -
बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी बसलेल्या अंबाबरवा अभयारण्यामध्ये जंगल सफारीसाठी पर्यटक दररोज येत असतात. वसाळी येथे शासनाने इको सायन्स पार्क तयार केले आहे. त्यामध्ये पर्यटकांना राहण्याची व जेवणाची अल्प दरामध्ये सोय करण्यात आलेली आहे. तसेच या पार्कमध्ये कुत्रिम प्राण्यांचे पुतळे निर्माण करण्यात आलेले असून सोबतच लहान मुलांना खेळण्यासाठी सुविधा देण्यात आली आहे. मुख्य मार्गवरती इको सायन्स पार्क येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळाही बसवण्यात आलेला आहे. या सर्व बाबींमुळे अनेक पर्यटक वासाळी येथे अंबाबरवा अभयारण्यमध्ये जंगल सफारी करण्यासाठी येत असतात.अशातच खामगाव येथील पर्यटकांना शुक्रवारी 19 मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास अभयारण्यामध्ये जंगल सफारी करत असताना वाघाचे दर्शन झाले.
TAGGED:
buldana news