बुलडाणा - स्थानिक गुन्हे शाखेला सराईत मोबाईल चोरट्यास पकडण्यात यश आले आहे. पोलिसांना चोरट्याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला आणि चोरट्याच्या मुसक्या आवळल्या. श्रीकृष्ण घाडगे असे चोरट्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार श्रीकृष्ण हा अकोला येथे भाड्याने राहायचा. त्याला गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी अटक केली आहे. तर, तपासा अंती श्रीकृष्ण घाडगेकडून बुलडाणा, अकोला, वर्धा, वाशिम इत्यादी ठिकाणांहून चोरलेले विवो, सॅमसंग, एमआय, रेडमी, ओपो, नोकीया, मॅइक्रोमॅक्स, मोटोरोला, जिओ, इंटेक्स, लिनोवो, माइक्रोसॉफ्ट इत्यादी कंपनीचे मोबाईल पोलिसांनी हस्तगत केली आहेत. एकूण ५ लाख ३२ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
सदर कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ पाटील, अपर पोलीस अधीक्षक डॉ.संदीप पखाले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शन व सूचनांनुसार स.पो.नि पांडुरंग इंगळे, ना.पो.कॉ पंकज मेहेर, ना.पो.कॉ गजानन अहीर, पो.कॉ विजय सोनोने, पो.कॉ केदार फाळके, वाहन चालक ना.पो.कॉ शिवानंद मुंढे यांनी सहभाग घेतला.
हेही वाचा- अकोला-खामगाव महामार्गावर एसटी-ट्रकचा अपघात; 26 जखमी