बुलडाणा - महात्मा फुले पतसंस्थेत कोट्यावधींची घोटाळा करून फरार पतसंस्थेचा अध्यक्ष दत्ता खरात याच्यासह व्यवस्थापकाला आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी 20 जानेवारीला अटक केली आहे. या दोन्ही आरोपींना पोलिसांनी औरंगाबाद येथून अटक केली. सोमवारी 21 जानेवारीला दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 25 जानेवारीपर्यंत कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा - बनावट नोटांसह दोन जणांना अटक; तीन लाखांचा मुद्देमाल जप्त
चिखली शहरातील महात्मा फुले पतसंस्थेचा अध्यक्ष आणि कर्मचाऱ्यांवर आर्थिक घोटाळाप्रकरणी 12 जुलै रोजी चिखली पोलीस स्टेशनला विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. घोटाळ्याचा आकडा हा चार कोटी रुपयांपर्यत असून या प्रकरणात संस्थेचा अध्यक्ष दत्तात्रय गणपत खरात, मुख्य शाखा व्यवस्थापक सतिश प्रल्हाद वाघ , रोखपाल परमेश्वर सुखदेव पवार, शाखा व्यवस्थापक गणेश कचरुजी खंडागळे यांनी अपरातफर केल्याचे निर्देशनास आल्याने त्यांच्यावर भांदवि कलम 420, 409, 406, 468, 470, 471, 477-अ, 34 तसेच महाराष्ट्रं ठेविदारांच्या (वित्तीय संस्थामधील हितसंबंधाचे संरक्षण) अधिनियम 1999 नुसार कलम ३ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते.
हेही वाचा - 'आता पाणी प्यायलाही भीती वाटते'; अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांचे वक्तव्य
या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून सतिश वाघ आणि परमेश्वर पवार या दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. तर उर्वरीत मूख्य आरोपी अध्यक्ष दत्तात्रय खरात आणि व्यवस्थापक गणेश खंडागळे हे दोन आरोपी फरार होते. फरार आरोपींना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीवरून दोघांना औरंगाबाद येथून पथकाने 20 जानेवारीला अटक केली. दरम्यान, या दोन्ही आरोपींना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायलयाने त्यांना 25 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे..