ETV Bharat / state

'मोदींनी #CAA लागू केल्यास, जसं इंग्रजांविरोधात जनतेने असहकार पुकारला तसंच आंदोलन आताही होईल' - सीएए कायद्याविरोदात असहकार

सीएए हा कायदा देशातील जनतेत फुट पाडणारा कायदा आहे. संपुर्ण देशात या कायद्याला विरोध होत आहे. लोक रस्त्यावर उतरत आहेत. त्यामुळे मोदींनी देशात सीएए कायदा लागू केल्यास, इंग्रजांविरोधात जनतेने जसा असहकार पुकारला होता. तसेच आंदोलन जनता आताही करेल, असे अबु आजमी यांनी म्हटले.

Abu Azmi
अबु आजमी
author img

By

Published : Jan 17, 2020, 2:49 PM IST

बुलडाणा - सीएए हा कायदा देशातील जनतेत फुट पाडणारा कायदा आहे. संपुर्ण देशात या कायद्याला विरोध होत आहे. यासाठी लोक रस्त्यावर उतरत आहेत. त्यामुळे मोदींनी देशात बळजबरीने हा कायदा लागू करण्याच प्रयत्न केला. तर, ज्या प्रमाणे इंग्रजांविरोधात जनतेने असहकार पुकारला होता. तसेच असहकाराचे आंदोलन जनता आता मोदींविरोधात करेल, असे अबु आझमी यांनी म्हटले. शेगाव येथे समाजवादी पक्षाचे आमदार अबु आजमी यांनी ईटीव्ही भारतला विशेष मुलाखत दिली, यावेळी त्यांनी आपले हे मत व्यक्त केले.

वेळ आल्यास लोक सीएए कायदा आणि नरेंद्र मोदींच्या विरोधात असहकार आंदोलन करतील - अबु आजमी

हेही वाचा... 'सत्तेसाठी सतराशे साठ, महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम्राट'

सीएए, एनआरसी आणि एनपीआर यामुळे देशात अशांततेचे वातावरण आहे. या कायदयाच्या विरोधात समाजवादी पक्षाच्यावतीने संपूर्ण देशात संविधान व देश वाचवण्यासाठी असहयोग आंदोलन राबवण्यात येत आहे. ज्याप्रमाणे इंग्रजांच्या विरोधात भारतीयांनी असहकार आंदोलन छेडले. त्याचप्रमाणे मोदी सरकार विरोधातही असहकार आंदोलन छेडले जाईल, असे समाजवादी पक्षाचे आमदार अबु आजमी यांनी म्हटले आहे.

हेही वाचा... झुंडशाहीने दलित आणि मुस्लिमांचा बळी घेणाऱ्यांचे कट्टर विचार कोण बदलणार?

ज्या लोकांनी १९४७ साली महात्मा गांधीजी, मौलाना अबुल कलाम आझाद, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व स्वीकारले होते. मोहम्मद अली जिना यांचे नेतृत्व झुगारले होते. त्याच लोकांना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागरिकत्वाचे प्रमाणपत्र मागत आहेत, असे आजमी यांनी म्हटले. याउलट जे लोक लोक गांधीजींच्या विरोधात होते. त्यांना मात्र या देशात आणण्याचे प्रयत्न नरेंद्र मोदी करत आहेत, असा आरोपही आजमी यांनी केला.

सीएए कायदा देशाच्या आणि संविधानाच्या विरोधात आहे. त्यामुळे संपूर्ण देशात या कायद्याला विरोध होत आहे. विशेष म्हणजे हिंदू मुस्लिमांनी वेगवेगळे व्हावे असे ज्यांना वाटत होते. त्यांचे मनसुबे जनतेने उधळले आहेत. कारण सर्व समाजाचे लोक या कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरत आहेत, असे आजमी यांनी सांगितले. जसे इंग्रजांच्या विरोधात भारतीयांनी असहकार आंदोलन छेडले होते. त्याचप्रमाणे या कायद्या विरोधाती जनता असहकार आंदोलन छेडणार आहे, अशी माहिती आजमी यांनी दिली.

हेही वाचा... फडणवीसांचे कार्यालय टेंडर घोटाळ्यांसाठीचा अड्डा होते; 'मेट्रो भवन टेंडर' घोटाळ्याची चौकशी व्हावी

राज ठाकरे हे नौटंकी करत आहेत...

राज ठाकरे यांनी मिमिक्री करुन भाजपवर टीका केली होती. त्याचबरोबर ‘लाव रे तो व्हिडीओ’म्हणत मोडी सरकारचे वाभाडे काढले होते. मात्र तेच राज ठाकरे भाजपसोबत जाण्याची चर्चा होत आहे. यावर बोलताना आझमी यांनी, राज ठाकरे ही मंडळी सध्या थकलेले आणि हरलेले आहेत, असा टोला लगवला. तसेच त्यांना प्रसिद्धीत येण्यासाठी काही तरी मुद्दा हवाय, म्हणून ते विरोध करण्याचा प्रयत्न करत आहेत. चित्रपटामध्ये एकच व्यक्ती ज्या प्रमाणे दोन रोल करतो त्या प्रमाणे राज ठाकरे करत आहेत. अशी टीका करत आजमी यांनी, एका वेळी मोदींची मिमिक्री करून त्यांच्या विरोधात बोलायचे आणि दुसरीकडे त्यांच्या सोबत उभा राहायचे, हा सपशेल नाटकबाजपणा आणि ढोंगीपणा असल्याचे म्हटले.

Intro:Body:Mh_Bul_Non-cooperation movement_ 10047

Story : इंग्रज काळाप्रमाणे मोदी काळातही असहकार आंदोलन - आ. आझमी
राज ठाकरे यांची नौटंकीच
आ. अबु आझमी यांची इ टीव्हीशी विशेष बातचीत

बुलडाणा : सीएए, एनआरसी आणि त्यापूर्वी एनपीआर यामुळे देशात अशांततेचे वातावरण असून या कायदयाच्या विरोधात समाजवादी पक्षाच्यावतीने संपूर्ण देशात संविधान व देश वाचविण्यासाठी असहयोग आंदोलन राबविण्यात येत. ज्या प्रमाणे इंग्रजांच्या विरोधात भारतीयांनी असहकार आंदोलन छेडले.त्याच प्रमाणे या सरकार विरोधातही असहकार आंदोलन छेडा असे आवाहन समाजवादी पक्षाचे आमदार अबु असीम आजमी यांनी गुरुवारी रात्री ई टीव्ही भारत ला दिलेल्या विशेष मुलाखतीत केले.. असहकार आंदोलनाच्या जनजागृतीसाठी ते शेगावात आले होते.
आ. आझमी पुढे म्हणले कि, ज्या लोकांनी १९४७ साली गांधीजी, मौलाना अबुलकलाम आझाद, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृतव स्वीकारले होते आणि आणि मोहम्मद अली जिना यांचे नेतृत्व झुगारले होते. अश्या लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रमाणपत्र मागील आहे. आणि ज्या लोकांनी गांधींजिच्या विरोधात होते त्यांना या देशात आणण्याचे प्रयत्न मोदी करीत आहे. हा प्रकार देशाच्या आणि संविधानाच्या विरोधात आहे. त्यामुळे संपूर्ण देशात या कायद्याबाबत विरोध होत आहे. विशेष म्हणजे हिंदू मुस्लिमांनी वेगवेगळे व्हावे असे ज्यांना वाटत होते त्यांचे मनसुबे हि उधळल्या गेले. यावरही हा कायदा लागू करण्यात आला तर ज्या प्रमाणे इंग्रजांच्या विरोधात भारतीयांनी असहकार आंदोलन छेडले.त्याच प्रमाणे या सरकार विरोधातही जनता असहकार आंदोलन छेडणार आहे. असे ते म्हणाले.
राज ठाकरे यांनी मिमिक्री करुन भाजपावर टीका केली होती.त्याचबरोबर ‘लाव रे तो व्हिडीओ’म्हणत मोडी सरकारचे वाभाडे काढणारे राज ठाकरे जर भाजप सोबत जात असतील तर ते ‘वारंवार थुंकून चाटण्या’सारखे आहे असे म्हणत अबू आझमी यांनी राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली होती. आझमी यांनी केलेल्या या टिकेवर सध्या राज्यभर जोरात चर्चा सुरु आहे यावर आझमी यांनी अछेडले असता ते म्हणाले कि, ते मंडळी सध्या थकलेले , हरलेले आहेत. त्यांना प्रसिद्धीत येण्यासाठी काही तरी मुद्दा हवाय म्हणून विरोधच प्रपंच ते करीत आहे. ज्यांच्या मागे जनसमर्थांचं नाही त्यांच्या विषय काय चर्चा करावी ? चित्रपटामध्ये एकच व्यक्ती ज्या प्रमाणे दोन रोल करतो त्या प्रमाणे राज ठाकरे करीत आहे. एका वेळी मोदींची मिमिक्री करून त्यांच्या विरोधात बोलायचं आणि दुसरीकडे त्यांच्या सोबत उभा राहायचे मग हे काय आहे ? हे सपशेल नाटकबाज आणि ढोंगीपणा असलयाचे त्यांनी सांगितले.
समाजवादी पक्षाला मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही यावर त्यांना छेडले असता ते म्हणाले कि, आपण मंत्रिपद मागिलेच नाही बाहेर राहूनही जनतेची कामे होतात. तीन पक्षामध्ये मंत्रिपद वाटल्या गेल्याने अडचन झाली. यामुळे सर्वांनाच मंत्रिपद मिळे असे कसे शक्य आहे? असेही ते म्हणाले.

फहीम देशमुख शेगाव (बुलडाणा)Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.