ETV Bharat / state

पंढरपुरात भाजपने एका मताला 10 हजार रुपये वाटले, हा 100 टक्के पैशाचा विजय- रविकांत तुपकर - पंढरपूर पोटनिवडणूक निकाल न्यूज

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या निकालानंतरक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. 'हा 100 टक्के पैशांचा विजय आहे. भाजपच्या समाधान अवताडे यांनी शेवटच्या तीन-चार दिवसात एका मताला 10 हजार रूपये वाटले', असे आरोप तुपकर यांनी केले आहेत. तसेच, राष्ट्रवादीवरही टीका केली आहे.

बुलडाणा
buldana
author img

By

Published : May 2, 2021, 10:56 PM IST

बुलडाणा - 'पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत असा निकाल लागेल हे 100 टक्के अपेक्षित नव्हते. परंतु शेवटच्या तीन-चार दिवसांमध्ये ज्या पद्धतीने पैसा वाटल्या गेला; मताला 10 हजार रुपये भाजपचे उमेदवार समाधान अवताडेंनी वाटले. ही संपूर्ण निवडणूक पैशावर गेली. 100 टक्के हा पैशाचा विजय झाला आहे', अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे. ते बुलढाण्यात बोलत होते.

पंढरपुरात भाजपने एका मताला 10 हजार रुपये वाटले, तुपकरांचा आरोप
वेळेत औषधोपचार मिळून रुग्णांचा जीव वाचावा, बेड मिळविण्यासाठी कुणाचीच परवड होऊ नये याकरिता बसल्या ठिकाणी जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरमधील बेडच्या उपलब्धतेची स्थिती तत्काळ कळावी. या उद्देशाने स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटरने 'ग्रोवसरी अ‍ॅप' लाँच केले. याप्रसंगी रविकांत तुपकरांनी हे वक्तव्य केले.

राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना 1 लाख 7 हजार 717 तर भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांना 1 लाख 9 हजार 450 मते मिळाली. भाजपचे समाधान अवताडे हे 3 हजार 733 मतांनी विजयी झाले आहेत. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन पाटील यांना अत्यल्प मते मिळाली आहेत.

'धनशक्तीचा विजय, शेतकऱ्यांचा पराभव'

'सगळेच निवडणुका जिंकण्यासाठी लढत नसतात. मुळामध्ये शरद जोशींनी आम्हाला एक सूत्र घालून दिलेले आहे. ते सूत्र राजू शेट्टींनीही घालून दिलेले आहे. कधी-कधी निवडणुका आंदोलन म्हणून लढवायच्या असतात. चळवळ जिवंत राहिली पाहिजे. त्या-त्या भागामध्ये चळवळीचे कार्यकर्ते जिवंत राहिले पाहिजेत. आंदोलन आणि प्रयोग म्हणूनही निवडणुका लढवल्या जात असतात. या निवडणुकीमध्ये पंढरपूरचा असा निकाल लागेल हे आम्हाला शंभरटक्के अपेक्षित नव्हतं. शेवटच्या तीन-चार दिवसांमध्ये ज्या पद्धतीने पैसा वाटला गेला. त्यामुळे धनशक्तीचा विजय झाला आणि शेतकऱ्यांचा पराभव झाला, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही', असे म्हणत तुपकरांनी भाजपवर हल्लाबोल केला.

तुपकरांची राष्ट्रवादीवर टीका

'स्वाभिमानी शेतकरी संघटना ही महाविकास आघाडीचा घटक आहे. फक्त पंढरपूर मंगळवेढा निवडणुकीपुरते आम्ही त्या ठिकाणी त्या मतदारसंघातून निवडणूक लढलो. कारण, तेथील दोन्ही उमेदवार भाजप आणि राष्ट्रवादीचे होते. त्यांनी शेतकऱ्यांचे जवळपास 86 कोटी रुपये उसाचे पैसे बुडावले. या बुडव्या उमेदवारांचा प्रचार आम्ही कोणत्याही परिस्थितीत करू शकत नाही. ही आमची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका होती. हे सगळे पैसे शेतकऱ्यांच्या घामाचे होते. या दोन्ही उमेदवारांनी शेतकऱ्यांचा ऊस घेतला, परंतु त्यांना पैसे दिले नाहीत. तेथील ज्या शेतकऱ्याचे पैसे बुडाले, तो आत्महत्येच्या दारात उभा आहे. म्हणून अशा बुडव्या उमेदवारांचा आम्ही प्रचार करणार नाही. तुम्ही उमेदवार बदलण्याची भूमिका घेतली पाहिजे. असे आमचे म्हणणे होते. राष्ट्रवादीने ज्या शेतकऱ्यांचे पैसे बुडवले त्याला उमेदवारी दिली. आम्ही आमचा उमेदवार मैदानात ठेवला. आमच्या लक्षात आलं होतं की, भाजप किंवा राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येईल. परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात हा पैसा वाटला गेला की, 100 टक्के पैशाचा हा विजय त्या ठिकाणी झाला आहे', अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी केली.

हेही वाचा - 'पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत आमचा थोडक्यात पराभव'

हेही वाचा - आदर पुनावाला यांनी माहिती द्यावी, पोलीस धमक्यांबाबत तपास करतील - गृहराज्यमंत्री

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.