बुलडाणा : जिल्ह्यातील दिग्रस (Latest news from Buldana) येथे महसूल पथकाने धाड (Raid by revenue team) टाकून अवैध रेती उपसा आणि साठवणूक करणाऱ्या 5 जणांवर कारवाई (action against sand miners) करण्यात आली. या कारवाईत अवैध रेतीसाठा करणाऱ्या ना एक कोटी 36 लाखांचा दंड (sand mafia fined) ही ठोठावण्यात आला आहे. (Buldana Crime) 540 ब्रास रेतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.
रेती माफियांमध्ये खळबळ : पथकाकडून रेती उपसा करणाऱ्या 5 बोटी, 2 टिप्पर आणि 2 पोकलॅंडही जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे अवैध रेती उत्खनन करणाऱ्या लोकांमध्ये खळबळ उडाली आहे. देऊळगाव राजा तालुक्यातून जाणाऱ्या खडकपूर्णा नदीपात्रातून रेती माफिया सर्रासपणे रेती उपसा करून त्याची चोरट्या मार्गाने विक्री करतात. त्यामुळे शासनाचा महसूल बुडतो. या कारवाईमुळे काही प्रमाणात का होईना महसूल जमा होण्यास मदत होईल.