बुलडाणा - एसटी बसने टेंभुर्णा फाट्याजवळ समोरुन येणाऱ्या ट्रकला धडक दिली. या धडकेत एसटीतील 26 प्रवासी जखमी झाले आहेत. सर्व जखमींना खामगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारसाठी भरती करण्यात आले. राज्य परिवहन महामंडळाची बस अकोल्यावरून परतताना संबंधित अपघात घडला.
आज (14 जानेवारीला) सकाळी अकोल्यावरून सिंदखेडा-धुळे ही एसटी खामगावच्या दिशेने येत होती. या बसमध्ये 55 ते 60 प्रवासी होते. प्रवासादरम्यान खामगाव जवळील टेंभुर्णा फाट्यावर इंडिका वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात समोरुन येणाऱ्या ट्रकला एसटीने जोरदार धडक दिली.
एसटी बसचा समोरील भाग पूर्णपणे तुटला असून 26 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात भरती केले.