बुलडाणा - नववर्षाचे स्वागत करताना दारू ऐवजी दूध पिण्याचा सल्ला देत बुलडाण्यातील शिवसंग्रामने नवी मोहिम हाती घेतली आहे. संदिप गायकवाड गेल्या सात वर्षांपासून 'दूध पिऊन नवीन वर्षाचे स्वागत', करा असा कृतीतून संदेश देत आहेत. आज गुरुवारी 31 डिसेंबर रोजी त्यांनी संगम चौकातील वाईन शॉपजवळ युवकांना दूध वाटप केले.
व्यसनमुक्त तरुणच देशाची खरी संपत्ती आहे, हे ओळखून गायकवाड परिवाराच्या वतीने 31 डिसेंबरच्या सकाळी संगम चौकातील वाईनशॉप दुकानासमोर 'दारू नको दूध प्या' हा उपक्रम राबवण्यात आला आहे. या उपक्रमातून शेकडो लोकांना दुधाचे मोफत वाटप करून त्यांनी व्यसनमुक्तीचा नारा दिला. यावेळी त्यांचा या उपक्रमाची स्तुती होत आहे.